अपंग व्यक्‍तींना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम

लोणावळा, (वार्ताहर) – अपंग व्यक्‍तींना शासकीय योजनांचा लाभ मिळण्याकरिता अपंग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम वाकसई पंचायत समिती गणात हाती घेण्यात आली असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य महादू उघडे यांनी दिली.

उघडे म्हणाले की, वाकसई गणातील कुणेनामा गावात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे. येथे सात अपंग लाभार्थी आहेत. मात्र त्यांच्याकडे अपंग प्रमाणपत्र नसल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. त्यांच्याकडे अपंग प्रमाणपत्र नसल्याने ते योजनांपासून लांब आहेत. सर्व लाभार्थींना सरकारी योजनांचा व सवलतीचा लाभ मिळावा, याकरिता कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असून गणातील सर्व ग्रामपंचायतींना याबाबत सूचना देणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)