अपंग मतदारांना लोकशाही प्रक्रियेची माहिती होण्यासाठी 3 डिसेंबरला विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

सातारा  – अपंग मतदारांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत अधिक जनजागृती व्हावी आणि त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने अपंग दिनी म्हणजेच दि. 3 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता यांनी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अपंग घटकांना सामावून घेण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक अयोगाने सुलभ निवडणुका हे घोषवाक्‍य जाहीर केले आहे. यानुसार अपंग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने 3 डिसेंबर रोजी अपंग दिन जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच विधानसभा मतदार संघ व मतदान केंद्रावर हा कार्यक्रम मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी व मतदार केंद्रस्तरीय अधिकारी साजरा करणार आहे.

-Ads-

अपंग दिनानिमित्त नव्याने नोंदणी झालेल्या अपंग मतदारांशी संपर्क साधून जिल्हास्तरावरुन पुरविण्यात आलेल्या बॅचेसचे वाटप करणे, लोकशाही निवडणूक प्रक्रियेबाबत अपंग मतदारांचे प्रबोधन करुन मतदार यादी भागामधील त्यांच्या नावाचा अनुक्रमांक, यादी भाग क्रमांक मतदान केंद्र ठिकाण यांची माहिती व मतदारांना आयोगाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच अपंग मतदारांचा सत्कारही करण्यात येणार आहे. शाळा , महाविद्यालयांमध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, परिसंवाद यासारख्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता यांनी कळविले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)