अपंग दिनानिमित्त दिव्यांग मतदारांना कार्यक्रमास येण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

सातारा – अपंग दिनाचा कार्यक्रम 3 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता यशवंतराव चव्हाण इनस्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालय, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये दिव्यांग मतदारांना बॅचेसचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग मतदारांचा सत्कार करण्यात येणार आहे. दिव्यांग मतदारांचा निवडणुकीमध्ये सहभाग वाढावा व मतदान केंद्रावरील देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात येणार आहे. तरी दिव्यांग मतदारांनी कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अपंग घटकांना सामावून घेण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक अयोगाने सुलभ निवडणुका हे घोषवाक्‍य जाहीर केले आहे. यानुसार अपंग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने 3 डिसेंबर रोजी अपंग दिन जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच विधानसभा मतदार संघ व मतदान केंद्रावर हा कार्यक्रम मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी व मतदार केंद्रस्तरीय अधिकारी साजरा करणार आहे.

-Ads-

अपंग दिनानिमित्त नव्याने नोंदणी झालेल्या अपंग मतदारांशी संपर्क साधून जिल्हास्तरावरुन पुरविण्यात आलेल्या बॅचेसचे वाटप करणे, लोकशाही निवडणूक प्रक्रियेबाबत अपंग मतदारांचे प्रबोधन करुन मतदार यादी भागामधील त्यांच्या नावाचा अनुक्रमांक, यादी भाग क्रमांक मतदान केंद्र ठिकाण यांची माहिती व मतदारांना आयोगाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच अपंग मतदारांचा सत्कारही करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, परिसंवाद यासारख्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता यांनी कळविले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)