अपंगास मारहाण ; पुतण्यावरही वार

पिंपरी – रॅश ड्रायव्हिंगचा जाब विचारल्याच्या कारणावरून नऊ जणांच्या टोळक्‍याने एका अपंगास लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना जुनी सांगवी परिसरात बुधवारी (दि. 7) रात्री अकराच्या सुमारास घडली.

उमेश माने, सागर नायर, ओंकार चव्हाण, सोन्या व इतर पाचजण (नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. विजय विनायक गायकवाड (वय 48, रा. बुद्धघोष हौसिंग सोसायटी, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अजय (वय-41) हे 60 टक्‍क्‍यांहून अधिक अपंग आहेत. जेवण केल्यानंतर ते डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले. त्यावेळी आरोपी वेगाने दुचाकी घेऊन गेला. याबाबत त्यांच्यासोबत असलेला पुतण्या तेजस (वय 21) यांनी जाब विचारला. या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी आपल्या साथीदारांना बोलविले. अपंग अजय यांना लाथ मारून खाली पाडले. त्यानंतर तेजस यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)