अपंगाचे प्रमाणपत्र देणाऱ्या एंजट पोलिसांच्या ताब्यात

सातारा – अपंग प्रमाणपत्र देण्याच्या बहाण्याने 92 हजारांची फसवणूक करणाऱ्या एंजटला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. गुरुवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात एक एंजट अपंगप्रमाणपत्र देत असल्याची माहिती पो.नि नारायण सारंगकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कर्मचाऱ्यांनी रुग्णालायत जात कारवाईचे आदेश दिले होते.

मिळालेल्या सुचनेनुसार, सातारा शहरचे कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी मिळालेल्या वर्णनाचा व्यक्तीची खात्री करून घेतली. व त्याच्यावर पाळत ठेवली होती. त्यावेळी तो व्यक्ती एक तरूणाशी बोलत होता. पोलिसांनी त्यांच्यातील संभाषण ऐकल्यानंतर त्यातील एकाला ताब्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी बाळकृष्ण नामदेव नारनवर (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) हा संतोष फडतरे (पूर्ण नाव माहित नाही) याला तूझ्या वडीलांना सांग अपंगप्रमाणपत्र लवकरच मिळेल असल्याची सांगत होता.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नारनवर याला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने आपण फडतरे याच्याकडून अपंग प्रमाणपत्र देण्यासाठी सतत गेली 9 वर्षे 92 हजार रुपये घेतल्याचे कबुल केले. मात्र यातील तक्रारदार फडतरे यांनी पोलिस ठाण्यात आल्यानंतर तक्रार देण्यास नकार दिल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)