अपंगांसाठी 5 टक्‍के जागा आरक्षित ठेवा…

विद्यापीठाकडून महाविद्यालयांना सूचना
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये 5 टक्के जागा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश विद्यापीठाकडून देण्यात आले आहेत. अपंगांसाठी 5 टक्‍के जागा आरक्षित ठेवण्याचे कायद्यात नमूद असले तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पुन्हा सर्व महाविद्यालयांचे कान टोचण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयामध्ये डिसेबल राईटस ग्रुप विरूध्द युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये न्यायालयाने याबाबतचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थी विकास मंडळाकडून याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. सर्व महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांनी पालन करावे असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी केल्याचा अहवाल सर्व संस्थांनी 25 जून 2018 पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्यापीठ प्रशासनाला हे सर्व अहवाल एकत्रित करून त्याची माहिती अपंग कल्याण आयुक्तालयाकडे सादर करावयाची आहे. अपंग व्यक्ती अधिनियम 2016 मधील कलम 32 अन्वये राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये 5 टक्के आरक्षण ठेवणे बंधनकारक आहे, मात्र याचे पालन होत नसल्याचे डिसेबल राईटस ग्रुपच्यावतीने न्यायालयाच्या निर्देशनास आणून देण्यात आले होते. यापार्श्वभुमीवर न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)