… अन पोलिसांचा आनंद दुणावला

एसपींनी केली विचारपूस;पोलिसांना दिला आधार

प्रशांत जाधव

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा, दि. 8 (प्रतिनिधी) -मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. 25 जुलै रोजी मराठा समाजाच्या आंदोलनाला गालबोट लागल्याने पोलिसांनी गुरूवारी खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्तात वाढ केली होती. पोलिसांना शहरात विविध ठिकाणी बंदोबस्ताचे पॉईंट दिले होते. त्या प्रत्येक पॉईंटवर जात जिल्हा पोलिस प्रमुखांनी जेवण, चहा घेतला का? अशी प्रत्येक कर्मचाऱ्याची विचापुस केल्याने कर्मचाऱ्यांचा आनंद दुणावला होता.

गेल्या वर्षी मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मूक मोर्चे काढले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी काढलेल्या ठोक मोर्चाला महाराष्ट्रातील काही ठिकाणी गालबोट लागले होते. दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणात हिंसा घडली होती. त्यात सरकारी, खासगी वाहने, एसटी बस यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड व जाळपोळ करण्यात आली होती. साताऱ्यातही पोलिसांच्या गाड्या जाळल्या होत्या. महामार्ग रोखला होता.

त्यावेळी पोलिसांच्या दिशेने जमावाने दगडफेक केली होती. दगडफेकीत तत्कालीन जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, अप्पर अधीक्षक विजय पवार,उपविभागीय अधिकारी गजानन राजमाने यांच्यासह 25 पोलिस जखमी झाले होते. त्यामुळे महाराष्ट्रभर  होणाऱ्या बंदच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात पोलिसांनी उपविभागीय अधिकारी गजानन राजमाने यांच्यासह तीन पोलिस निरीक्षक, 15 सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या, 250 पोलिस कर्मचारी, 60 होमगार्ड असा चोख बंदोबस्त ठेवला होता.

फक्त आंदोलस्थळी पोलिस बंदोबस्त न नेमता पंकज देशमुख यांनी शहरातील विविध भागात बंदोबस्त नेमला होता. काही ठिकाणी बुधवारी रात्रीच तर काही ठिकाणी गुरूवारी सकाळी बंदोबस्त  होता. संवेदनशील भाग, शहरात येणारे प्रमुख रस्ते, महामार्ग असा विविध ठिकाणी बंदोबस्त नेमला होता. गुरुवारी सकाळी जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख हे गुरूवारी सकाळी आठ वाजल्यापासुनच शहरातील बंदोबस्ताचा आढावा घेत होते.

दरम्यान ते प्रत्येक ठिकाणी जातील तेथे बंदोबस्ताची माहिती घेत होते. सोबतच ते बंदोबस्तावरील प्रत्येक कर्मचारी, अधिकाऱ्यांची आस्थेने विचारपुस करत होते. सकाळी ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांनी चहा, नाष्टा झाला का? अशी विचारणा केली. त्यानंतर दुपारच्या वेळी ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी जेवन केले का? असे विचारत सर्वांची चौकशी केली.

एसपींच्या या आपलेपणामुळे बंदोबस्तावरील पोलिस भारावुन गेले होते. जिल्हा पोलिस प्रमुख पदावरील  अधिकारी कॉन्स्टेबलची आस्थेने विचारपुस करतो. या कल्पनेनेच कर्मचाऱ्यांचा आनंद दुणावला होता.

… त्यामुळे काम करण्यास उर्जा मिळते
पोलिस दालत नोकरी करताना समाजाची शांतता राखण्याचे मोठे आव्हाण असते. हे करत असताना कोणत्या ना कोणत्या कारणाने पोलिसच टिकेचा धनी होतो. अशावेळी आपले कोणी तरी असावे असे वाटते. जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी केलेली विचारपुस काम करण्याची उर्जा देणारी आहे. असे एका पोलिस कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)