…अन् शाळेत शिरले दहशतवादी

पालकांमध्ये घबराहाट : सैनिकांनी “मास्टर प्लॅन’द्वारे केला खात्मा

पुणे – एका प्रायमरी स्कूलमध्ये दशहतवादी घुसले असून, शिक्षक आणि चिमुकल्यांना बंदुकीचा धाक दाखवून ओलीस ठेवले… मुलांच्या रडण्याचा आवाज येऊ लागला… ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि पालकांमध्ये घबराहाट पसरली… तेवढ्यातच हेलिकॉप्टरमधून आलेल्या सैनिकांनी दोरीच्या सहायाने उड्या मारून स्कूलला घेरले. मात्र, सैनिकांची एक चूक ही चिमुकल्यांच्या जीवावर बेतणारी होती. अशा प्रसंगात सैनिकांनी तयार केलेल्या “मास्टर प्लॅन’नुसार स्कूलमध्ये प्रवेश करत सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करून चिमुकल्यांची सुटका केली. हा थरारक प्रसंग घडला औंध मिलिटरी स्टेशनवर.

साहजकीच हा थरारक वाचल्यावर कोणाच्याही मनात धडकी भरेल. मात्र, हा थरार बिम्सटेक (बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्‍टरल टेक्‍निकल अँण्ड इकॉनॉमिक को-ऑपरेशन)तर्फे युध्दसरावासाठी आयोजित करण्यात आला होता. या युध्द सरावामध्ये भारत, भूतान, बांग्लादेश, म्यानमार आणि श्रीलंका सहभागी झाले आहेत.

दरम्यान, भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्याचा सामना करण्यासाठी हे सर्व देश एकत्र आले असून, प्रत्येक देशाकडून तीस जणांची तुकडी सहभागी झाली आहे. नेपाळ आणि थायलंड यांनी केवळ त्यांचे निरीक्षक पाठविले आहेत. हा सराव सहा दिवसांचा असून, येत्या 16 सप्टेंबर रोजी त्याचा समारोप होईल. याप्रसंगी भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, रक्षा राज्यमंत्री सुभाष भामरे, सर्व सहभागी राष्ट्रांचे लष्करप्रमुख उपस्थित राहणार आहेत. व्हाइट हाऊस, ब्राऊन हाऊस, ग्रीन हाऊस असे विविध प्रकारचे ड्रीलचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. त्यामधून सर्व देशांनी दहशतवाद्यांशी कसे संपविले, त्याचे प्रात्याक्षिक दाखवून दिले.

सांस्कृतिक देवाणघेवाण अन्‌ मैत्रीचे नाते
युध्दसरावाच्या निमित्ताने पाच देशांचे जवान एकत्र आले असून, यामधून एकीची भावना तर निर्माण होते. त्याचबरोबर आपआपल्या देशाची सांस्कृतिक देवाणघेवाण, भाषा, वेशभूषा त्यांना शिकायला मिळत आहे. यामध्ये भाषेचा थोडाफार बदल आहे. मात्र, त्यातही जवान आनंदाने मिळून-मिसळून राहत असल्याचे पहायला मिळते. त्यामुळे मैत्रीचे नाते अधिक भक्कम झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)