अन् ‘देवेंद्र’च्या रुपात देव धावून आला…

मुंबई: प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पाच ब्रासपर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न आकारता मोफत देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंवाद’ कार्यक्रमात केली.

शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचल्यानंतर त्यातून होणारा लाभत्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणांची माहिती घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून लोकसंवाद’ कार्यक्रमाद्वारे लाभार्थ्यांशी संवाद सुरू केला. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आज राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना तसेच रमाई आवासशबरी घरकुलपंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेच्या चांदा ते बांद्यापर्यंतच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला. विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या लाभार्थ्यांबरोबरच विविध आवास योजनेतून बांधलेल्या घरातील प्रत्यक्ष लाभार्थ्यांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

दरम्यान इचलकरंजी येथील ज्योत्स्ना दशरथ घोडके म्हणाल्या, माझे कच्चे घर होते. घराची पडझड झाली होती. त्याचवेळी मुलीचे बाळंतपण आले होते. त्या विवंचनेत असतानाच प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाल्याचा निरोप अधिकाऱ्यांनी स्वतःहून दिला अन् ‘देवेंद्रच्या रुपात देव’ भेटल्याचा आनंद झाला. घराचे बांधकाम झाल्यामुळे मुलीचे बाळंतपणाचे दिवस सुखरुप झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)