अन्‌ 26 वर्षांची मैत्री झाली पुन्हा ताजी

माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याने आनंदले तांबवेतील “श्रीमानशेठ’ विद्यालय
प्रशांत ढावरे
लोणंद – शिक्षणाच्या निमित्ताने एकत्र आलेले मित्र 26 वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र आले अन्‌ मैत्रीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. निमित्त होते ते माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे. स्थळ होते फलटण तालुक्‍यातील तांबवे येथील श्रीमानशेठ गणपतराव सूर्यवंशी विद्यालयाचे मैदान.

तांबवे, ता. फलटण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमानशेठ गणपतराव सूर्यवंशी विद्यालयात रयत शताब्दी वर्षाचे औचित्य साधून सन 1992 बॅचमधील विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. ते सर्वजण एकाच वर्षात शिकले, एकत्र खेळले अन्‌ दहावी परीक्षा देऊन आपआपल्या मार्गाने निघुन गेले. माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने हे सर्वजण सव्वीस वर्षानंतर एकत्र आले. त्यातले काहीजण लेकरा बाळासह आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपण बसत असलेला वर्ग त्यातील बाकडे, शाळेच्या प्रांगणात लावलेली झाडे, शाळेच्या पिण्यासाठी नूतन खोदलेली बोअरवेल, पिण्याच्या पाण्यासाठी नूतनीकरण केलेली सुंदर टाकी, मुलींच्यासाठी बांधलेले नूतन स्वच्छतागृह हे दाखवण्यात व बघण्यात सर्वजण मग्न झाले होते. हा प्रसंग पाहुन तांबवेतील शाळेची इमारतही आनंदली. पुणे, मुंबई, सातारा, बारामती, नगर, सोलापूर, औंध, काशिळ कोपर्डे, फलटण, वाई, खंडाळा इतर गावातून आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना जुन्या मित्र मैत्रिणींना भेटण्याच्या उत्सुकतेमुळे अनेकजण सकाळी आठ वाजलेपासून शाळेत येण्यास सुरुवात झाली.

अनेक वर्षापासून न भेटलेले मित्र मैत्रिणी कधी भेटतील यासाठी सर्वजण उतावीळ झाले होते. प्रत्येक मित्र एकमेकांच्या हातात हात गळाभेट घेत होते. विद्यार्थी उपस्थितीमुळे शाळेचे पटांगणही अगदी बोलके झाले होते. प्रत्येक जण आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत होते. आपल्या गुरुजनांनी दिलेले संस्कार आपल्या भविष्यकाळात कशी उपयोगी पडले. या बाबतीत विद्यार्थ्यांमध्ये चर्चा रंगली.मुलांमध्येही आपल्या आई वडिलांच्या शाळेत आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

मुलगी सासरहून माहेरी आल्यानंतर जसा आनंद द्विगुणीत होतो तसा सर्व जणांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गात असणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना एक भेट म्हणून पैठणी साडी भेट दिली तर शिकवत असणाऱ्या गुरुजनांना पूर्ण पोषाख देऊन त्यांचेबद्दलचा आदरभाव व्यक्त केला. जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मित्र मैत्रिणी व गुरुजनांसोबत भोजनाचा यथेच्छ आनंद लुटला. यावेळी माजी शिक्षक म्हस्के, गायकवाड, भोकरे, साळुंखे, सौ. पंडित, जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

सोशल मीडियामुळे जुने मित्र एकत्र
सध्या अनेक ठिकाणी शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमेळावे आयोजित करणेत येत आहेत. हे सारे घडतेय फेसबुक, व्हॉट्‌सऍपच्या मदतीने, दुर गेलेले मित्र, तसेच लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली, मैत्रिणी एकमेकांचे मोबाईल देवाणघेवाणामुळे नवीन ग्रुप तयार होतो आणि नवनविन उपक्रम साजरे होत आहेत. मोबाईलमुळे जग जवळ येत असल्याचेही काहींनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)