अन्‌ हवेत उसळून विद्यार्थी जमिनीवर आदळला

चाकण- नेहमीप्रमाणे वाहतुकीची वर्दळ प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई आणि याच पुढे जाण्याच्या स्पर्धेमुळे स्वतःची व दुसऱ्याची काळजी न करता वाहने पुढे दामटण्याचा आततायीपणामुळे पुणे-नाशिक महामार्गावर चाकण वाघेवस्ती जवळून सुसाट जाणाऱ्या दुचाकीची धडक एका दहावीच्या विद्यार्थ्यांला बसली अन्‌ चेंडू हवेत उसळून जमिनीवर आदळावा तसा तो उडून रस्ता दुभाजकावर आदळल्याने जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. 19) घडली.
गणेश हाके (वय 15) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून तो दहावीची परीक्षा देत असून सध्या त्याचे दोन पेपर बाकी आहेत. दुचाकीने जशी जोरात ठोस दिली तसा गणेश रस्ता दुभाजकवर आदळला आणि तोंडातून आर्त वेदनेची किंकाळी बाहेर पडली त्याच्या पुढच्या क्षणी बेशुद्ध झाला. या अपघातात दुचाकीस्वाराला भरपूर मुका मार लागला पण लोक मारेल या भीतीने गाडी उचलून त्या दुचाकीस्वराने पळ काढला .
इकडे दुभाजकावर पडलेल्या जखमीला पाहण्यासाठी गर्दी झाली. तिथेच ट्राफिक पोलीस चौकीजवळ असणारे पोलीस मित्र व शिक्षक बापूसाहेब सोनवणे यांनी आरडाओरडा ऐकून त्या ठिकाणी धाव घेतली. तोपर्यंत अपघातातील जखमी काहीसा शुद्धीवर आला होता. तर नागरिकांनी त्यास जवळच्या रुग्णालयात भरती केले. त्यावेळी त्याच्या पायाच्या घोट्यापासून हाडाचे दोन तुकडे झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, हे ऐकताच गणेशच्या आई-वडीलांवर संकट कोसळले. तसेच गणेशचे ऑपरेशन करावे लागेल आणि खर्च 40 ते 45 हजार रुपये होईल असे सांगण्यात आले. मात्र, हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या कुटुंबाला गणेशाचा अपघातातील हा खर्च न पेलवणार आहे. त्यामुळे पोलीस मित्र व शिक्षक बापू सोनवणे यांनी नेहमी गरजवंतांना मदत करणारे डॉ. विजय गोकुळे यांचा सल्ला घेतला. स्वतःच रुग्णाच्या केसपेपवर सही करून 2 तासांत झालेले 5000 रुपयांचे बिल भरून प्लास्टर सहित गणेशला उचलून स्वतःच्या गाडीत घेऊन चिंचवड येथील अस्थिविकारतज्ज्ञ डॉ.अमित स्वामी यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेव्हा डॉ. स्वामी यांनी निम्म्या खर्चात शस्त्रक्रिया करण्याचे मान्य केले. यासाठी आप्पासाहेब गवारे यांनी आर्थिक मदत केली.
अर्थात गणेशला दहावीची उर्वरीत पेपर देता यावेत म्हणून त्याला हॉस्पिटलमधून आणणे तसेच पुन्हा सोडणे ही जबाबदारी खंडू शिंदे यांनी घेतली. या धकाधकीच्या जीवनात समाजातील देणारे असंख्य हात पुढे आले आणि या घटनेवरून माणुसकी जिवंत असल्याचा अनुभव आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)