…अन्‌ सार्वजनिक स्वच्छतागृहांचे रुपडे पालटले!

पिंपरी – चकचकीत स्वच्छतागृह… प्रवेशद्वारासमोर रांगोळ्यांचे गालिचे…मन प्रसन्न करणाऱ्या शोभेच्या झाडांच्या कुंड्या… असे सारे कधी न दिसणारे चित्र सोमवारी (दि. 19) शहरातील सार्वजनिक शौचालयांसमोर पहायला मिळाले. निमित्त होते जागतिक शौचालय दिनाचे.

महापालिका परिसरातील सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता ही विशेष मोहीम राबविण्यात आली. अ क्षेत्रीय कार्यालयातील चिंचवड स्टेशन येथील साफ शौचालय, खडी मशीन जय मल्हार नगर झोपडपट्टी काळभोरनगर, मोरवाडी घरोंदा हॉटेलच्या समोरील शौचालयाची चांगल्या पद्धतीने स्वच्छता करून रांगोळी काढण्यात आली होती. ब क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 22 मधील स्मशानभूमी शेजारी, जाधववस्ती, वाल्हेकरवाडी, गावडे जलतरण तलावाशेजारील पांढरीचा मळा येथील सार्वजनिक शौचालये यांची साफसफाई करण्यात आली. क क्षेत्रीय कार्यालयामध्ये नेहरुनगर, वरदहस्त सोसायटी खराळवाडी, जाधववाडी गवळीमाथा तसेच ड क्षेत्रीय मधील पिंपळे सौदागर स्मशानभूमी जवळ, दत्तमंदिराजवळ, पिंपळे गुरव येथील इंगवले आळी, वाकड गावठाण परिसरातील सार्वजनिक शौचालयांची साफसफाई करुन “सेल्फी’ काढण्यात आला.

इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शांतीनगर, बोपखेल गावठाण, सखुबाई गवळी उद्यान, मोशी चौक तर फ क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 1 मधील चिखली घाट, प्रभाग क्रमांक 11 दुर्गानगर, साने चौक, चव्हाण वस्ती, तळवडे , महाराणा प्रताप चौक, तसेच स्मशानभूमी निगडी येथील सार्वजनिक शौचालयांची साफसफाई करण्यात आली. ग क्षेत्रीय कार्यालयातील पिंपरी शास्त्रीनगर, संजयग ांधीनगर झोपडपट्टी परिसरातील व ह क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 30 संजयनगर फुगेवाडी, लांडेवाडी, सिध्दार्थनगर दापोडी येथील झोपडपट्टी परिसरातील सामुदायिक शौचालये, लांडेवाडी शिवाजी पुतळ्यामागील सार्वजनिक शौचालयांची साफसफाई करुन जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात आला.

शौचालयाची स्वच्छता ठेवण्याचे आवाहन
नागरिकांनी शौचालयाचा वापर करताना पाण्याचा योग्य प्रमाणात वापर करावा. तंबाखू, पान, गुटखा खाऊन थुंकू नये. शौचालयाचे बाहेर शौचास बसू नये. शौचालय व परिसरात कचरा टाकू नये. शौचालयातील साहित्य, वस्तू यांची नासधूस करु नये. शौचालय व शौचालयाचा परिसर स्वच्छ ठेवून आपले शहर सुंदर ठेवण्यास महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)