अन्‌ सर्व पक्षीय कार्यकर्ते हास्यविनोदात रमले

  • मंचर येथील बैलगाडा घाटाची पाहणी करताना राजकीय ताणतणाव निवळला

मंचर – मंचर पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीच्या श्रेयावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपाची फैरी झडत असताना बैलगाडा घाटाच्या पाहणीत हास्यविनोदात सर्वपक्षीय कार्यकर्ते रमले होते. त्यामुळे राजकीय ताणतणाव कमी झाल्याचे दिसून आले.
मंचर शहराच्या नळयोजना मंजुरीच्या श्रेयावरून गेली पाच दिवस शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन आरोप-प्रत्यारोप तसेच सोशल मीडियावरून टिकाटिपणी करणे सुरू आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनीच मंचरची नळयोजना मंजूर केल्याचे राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने सांगितले जात आहे. तर शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीच नळयोजना मंजूर केल्याचे शिवसेना कार्यकर्ते सांगत आहे. त्यामुळे मंचर शहरात राजकीय तणाव गेली काही दिवस पहावयास मिळत आहे.
मंचर येथील राजकीय तणाव किती दिवस राहिल. याचा भरवसा नव्हता. परंतु शनिवारी मंचर शहर यात्रा समितीचे अध्यक्ष दत्ता थोरात, सरपंच दत्ता गांजाळे, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, साईनाथ पतसंस्थेचे संचालक युवराज बाणखेले, मंगेश बाणखेले, मंचर पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष वसंत बाणखेले, प्रवीण मोरडे, जे. के. थोरात, संतोष मोरडे, अरूण बाणखेले, लक्ष्मण थोरात भक्‍ते, संजय बाणखेले, जगदिश घिसे, सुरेश निघोट यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते बैलगाडा घाट पाहणीसाठी एकत्र आली.
मंचर येथे लवकरच बैलगाडा शर्यती होणार असल्याने घाटाची पहाणी करण्यासाठी कार्यकर्ते एकत्र आले. घाटाच्या दुरूस्तीबाबत कामांबाबत सूचना केल्या. त्यामुळे मंचर पाणीप्रश्‍नाच्या श्रेयावरून असलेला ताणतणाव येथे जाणवला नाही. एकमेकांना टाळ्या देऊन हास्यविनोदात सर्वजण रमले होते. त्यामुळे विकासकामे होण्यासाठी आमचा आग्रह असतो. आरोप-प्रत्यारोप करतो.राजकारणही होते. परंतु मनात कोणताही आकस न ठेवता गावाच्या विकासकामासाठी राजकीय जोडे बाजुला ठेऊन आम्ही एकत्र येतो, असे शिवसेनेचे सरपंच दत्ता गांजाळे, अपक्ष पंचायत समिती सदस्य प्रा. राजाराम बाणखेले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते दत्ता थोरात, वसंत बाणखेले, युवराज बाणखेले हे मात्र सांगण्यास विसरले नाही.

  •  गावाच्या विकासासाठी राजकीय जोडे बाजूला
    मंचर येथील नळयोजनेच्या श्रेयावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना पक्षात आरोप-प्रत्यारोपाने राजकारण ढवळून निघत असताना बैलगाडा घाटाच्या पहाणीसाठी पक्षाचे पदाधिकारी एकत्र आले होते. राजकीय पदाधिकारी एकमेकांची चेष्टामस्करी आणि टाळ्या देत होते. त्यामुळे राजकारण असल्यावर तेथे राजकारण करतो. आणि गावच्या विकासासाठी राजकीय जोडे बाजुला ठेवतो हे मात्र, सांगण्यासाठी ते विसरले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)