…अन्‌ विरोधी पक्षनेता परदेश दौऱ्यावर

पिंपरी – पिंपरी-चिंचवडचे महापौर, स्थायी समिती सभापती शहरात तर विरोधी पक्षनेते परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे विरोधी चित्र निर्माण झाले आहे. दौऱ्याला विरोध करणारे विरोधकच दौऱ्यात सहभागी होत असल्याने विरोधी पक्षांच्या भुमिकेबाबत संशय निर्माण झाला आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त आणि सह शहर अभियंता एकदिवस अगोदरच बार्सिलोनात पोहचले आहेत.

स्पेन देशातील बार्सिलोना शहरात 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान स्मार्ट सिटी एक्‍स्पो वर्ड कॉंग्रेस 2018 या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जगातील शहरांच्या विकासासाठी भविष्यकालीन दृष्टीकोन, ध्येय ठरवून जगातील शहरे विकास करणे. शहर राहण्यायोग्य बनवणे. यावर मंथन होणार आहे. 400 तज्ज्ञ चर्चासत्रे, परिसंवादाच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.

-Ads-

या परिषदेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण रिप्रेझेंटेटिव्ह स्मार्ट सिटी वर्ल्ड कॉंग्रेस यांच्याकडून पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या संचालकांना मिळाले होते. तथापि, या दौ-यात स्मार्ट सिटीचे संचालक तथा महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड सहभागी होणार नाहीत. तर, स्मार्ट सिटीचे संचालक असलेले सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे गटनेते सचिन चिखले, शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त श्रावण हर्डीकर, स्मार्ट सिटी सेलचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण आणि सह शहर अभियंता राजन पाटील दौऱ्यात सहभागी होणार आहेत.

आयुक्त हर्डीकर आणि सह शहर अभियंता पाटील दोघे एकदिवस अगोदर म्हणजे आजच बार्सिलोनात पोहचले आहेत. तर, उर्वरित संचालक आज मध्यरात्री बार्सिलोनाकडे टेक ऑफ करणार आहेत. हा परदेश दौरा स्मार्ट सिटीच्या संचालकच आहे. परंतु, दौऱ्याला येणारा 20 लाख 21 हजार रुपयांचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)