अन्‌ मनपाचा भोंगा वाजलाच नाही…

नगर: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना 30 जानेवारी रोजी पुण्यतिथी निमित्त दरवर्षी सकाळी अकराच्या ठोक्‍याला अहमदनगर महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीतील भोंगा वाजतो. त्यानंतर महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसह हा आवाज शहरातील ज्या भागापर्यंत पोहोचतो, तेथील नागरिकही स्तब्ध उभे राहून श्रद्धाजंली अर्पण करतात. परंतु, यावर्षी पहिल्यांदाच प्रशासनाला हा भोंगा वाजविण्याचा विसर पडला.

30 जानेवारी हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथीचा दिवस. महापालिकेच्या जुन्या इमारतीतील भोंगा दरवर्षी या दिवशी सकाळी अकराच्या ठोक्‍याला वाजतो. त्यावेळी जुन्या इमारतीमधील सर्व कर्मचारी, अधिकारी व या भोंग्याचा आवाज शहरातील ज्या परिसरात जातो, त्या ठिकाणचे नागरिक जागेवरच स्तब्ध राहतात. त्यांच्याकडून काही क्षण राष्ट्रपिता गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करतात. परंतु यावर्षी पहिल्यांदाच सदर प्रकाराचा महापालिका प्रशासनाला विसर पडला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सकाळी 11 ला भोंगा वाजलाच नाही. त्यामुळे ही बाब आज दिवसभर शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरली होती. महात्मा गांधी हे दिवंगत झाल्यानंतर पहिल्यांदाच पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणे अनेकांना त्यांना श्रद्धांजली अर्पण करता आली नाही. अनेक वर्षांची शहरातील परंपरा एका दिवसात प्रशासकीय निष्काळजीपणामुळे पहिल्यांदाच खंडीत झाली. निष्काळजीपणा करणाऱ्यांविरुद्ध प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)