…अन्‌ बेवारस वृद्ध महिलेचे वाचले प्राण

“मनसे’ च्या जिल्हाध्यक्षांचे कामही “मनसे’

कराड – फक्‍त राजकीय उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करणारे अनेक राजकारणी आपल्याला सभोवताली दिसतात. पण राजकारणातूनही समाजकारण करणारे काही थोडकीच असतात. ज्यांचा जन्मच फक्‍त सामाजिक कार्यासाठी, दिनदुबळ्यांना मदत करण्यासाठी झालेला असतो. असेच एक व्यक्‍तिमत्त्व म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षा मिनाक्षी पोळ. या आपले प्रत्येक काम अगदी मनापासून करतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ज्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. तेव्हापासून त्यांनी सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतले आहे. कोठेही असो तेथे आपल्या कामालाच त्या प्राधान्य देतात. दोन दिवसांपूर्वी पुणे-बेंगलोर हायवेवर रस्त्याच्या एका बाजूला पडलेली वृद्ध महिला नजरेस पडताच त्यांनी तिला तातडीने उपचारासाठी कराडला शासकीय रुग्णालयात पाठविले. त्यामुळे निपचित पडलेल्या वृद्धेचे प्राण वाचले.

मिनाक्षी पोळ या काही कामानिमित्त उंब्रजहून कराड येथे निघाल्या होत्या. येथून परतताना दुपारी 12 च्या सुमारास एक वयस्कर महिला खोडशी, ता. कराड येथील पुणे-बेंगलोर हायवेवर कोयना दूध संघासमोर रस्त्याच्या बाजूला अत्यंत वाईट अशा परिस्थितीमध्ये निपचित पडलेली आढळून आली. त्यावेळी पोळ यांनी तात्काळ गाडी थांबवली. त्या महिलेची चौकशी केली पण तिच्याविषयी कोणालाही काही सांगता आले नाही. काही जण तिच्याकडे पाहून पुढे जाताना दिसले. पण मदतीला कोणीच पुढे सरसावत नव्हते.

त्या वृद्ध महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने पोळ यांनी तात्काळ ऍम्ब्युलन्स बोलावून त्यांना कराडच्या स्व. सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मिनाक्षी पोळ यांनी दाखविलेल्या तप्तरतेमुळे त्या वृद्ध महिलेचे प्राण वाचण्यास मदत झाली. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)