… अन्‌ प्रवाशांच्या हृदयाचा चुकला ठोका

पिरंगुट घाटात पीएमपीचा ब्रेक “फेल’ ; चालकाच्या प्रसंगावधाने 65 जणांचे वाचले प्राण

पिरंगुट- येथील घाटात पीएमपीचा ब्रेक फेल झालेला… चालकाला बस कशी थांबवावी ते कळेना… डावीकडे खोल दरी.. अशातच चालकाने प्रसंगावधान राखत बस उजवीकडे डोंगराळ भागात घातल्या बस थांबली अन्‌ बसमधील सुमारे 65 प्रवाशांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. मात्र, या घटनेने प्रवाशांच्या मनामध्ये चांगलीच भीती निर्माण झाली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.30 नोव्हेंबर) दुपारी दोन ते अडीच्या सुमारास घडली आहे.
याबाबतची माहिती अशी की, डेक्कनवरून पौडच्या दिशेने पीएमपी बस निघाली होती. बस पिरंगुट घाटात आली. दरम्यान, बसचा ब्रेक लागत नसल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखत बस उजव्या बाजूकडे असलेल्या डोंगराळ भागात घातली. डोंगराळ भागाला बस धडकल्याने थांबली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घडलेल्या घटनेमुळे मात्र बसमधील प्रवाशांच्या काळजाचा ठोका मात्र चुकला. पौडच्या दिशेने जाताना पिरंगुट घाटात डाव्या बाजूला दरी आहे. जर बस डाव्या बाजूला गेली असती तर बस दरीत कोसळून मोठे जीवितहानी झाली असती. केवळ दैव बलवत्तर व चालकाचे प्रसंगावधान यामुळे मोठी दुर्घटना टळली. जर या घटनेत मोठे नुकसान झाले असते तर याला जबाबदार कोण असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

  • बस पिरंगुट घाटात आल्याने बसचा ब्रेक अचानक फेल झाला. काही क्षणातच बस बाजूला जाऊन धडकली. त्यामुळे काय घडले हे कळेलच नाही. मात्र या घटनेमुळे बसने प्रवास करण्याची भीती वाटू लागली आहे. पीएमपी प्रशासनाने या मार्गावर सुस्थितीत व चांगल्या बस सोडाव्यात. जेणेकरून कोणतीही हानी होणार नाही.
    – पौर्णिमा देशपांडे, प्रत्यक्षदर्शी तथा प्रवासी
  • नादुरुस्त गाड्या नित्यनियमाने…..
    डेक्कनवरून पौड, घोटावडे, उरावडे, शेरे, रिहे या भागात बस सेवा सुरू आहे. मात्र या भागात येणाऱ्या बस गाड्या सुस्थितीत नाहीत. अनेक गाड्यांच्या काचा निखळल्या आहे. आसनांची दुरवस्था झालेली आहे. इंजिनमधून धूर येणे, टायर फुटणे आदी समस्यांनी पीएमपीला ग्रासले आहे. याआधी पिरंगुट घाटात दोनवेळा बसने अचानक पेट घेतला आहे. या मार्गावर बसचे बंद पडण्याचे तर नित्यनियमाने ठरलेले आहे. मात्र या घटनेमुळे प्रवाशामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. बसने प्रवास करायचा की नाही अशी भीती प्रावाशांच्या मनात निर्माण झाली आहे. आधीच तोट्यात असलेली बससेवा यामुळे आणखी तोट्यात येण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाचा विचार करता दर्जेदार व सुस्थितीत असलेल्या बसेस या मार्गावर सोडाव्यात अशी मागणी मुळशीकर जनतेकडून होत आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)