…अन्‌ काकड आरतीची परंपरा पुर्ववत!

पिंपरी – संत तुकाराम महाराजांचा परतीचा पालखी सोहळा यंदा प्रथमच चिंचवडगावातून पुढे मार्गस्थ झाला. यानिमित्ताने अनेक वर्षांपासून खंडित झालेली काकड आरतीची परंपरा जोमात चालु करण्यात आली. दिंडी व मिरवणूक काढून काकड आरती सोहळ्याची सांगता करण्यात आली.

गावातील तरुण तसेच ग्रामस्थ, चिंचवड गावातील भजनी मंडळे यांच्या माध्यमातून गेले महिनाभर काकड आरती सुरू होती. त्याच्या सांगता निमित्ताने सकाळी काकड आरती झाली. त्यानंतर अत्यंत उत्साहाच्या वातावरणात दिंडी व मिरवणूक झाली. त्यामध्ये तरुण व ग्रामस्थ व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डोक्‍यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला, टाळ-मृदुंगाच्या गजरातील दिंडी सोहळ्याने वातावरण भक्तीभावाने भारावले होते. मिरवणूक मार्गावर रांगोळीच्या पायघड्‌या घालण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. तुतारीच्या निनादात हा सोहळा रंगतदार झाला होता. वारी सोहळ्याचा अनुभव चिंचवडकरांनी यानिमित्ताने घेतला.

ह.भ.प. मधुकर महाराज ढाले व त्यांना मृदुंगनाथ शिंदे महाराज यांची साथ लाभली. त्याचबरोबर ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांचे कीर्तन तर ह.भ.प. मधुकर महाराज मोरे यांचे काल्याचे कीर्तन झाले. कीर्तन सोहळ्याला अबाल-वृद्धांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यानिमित्त ग्रामस्थ व तरुणांनी ही परंपरा यापुढेही अखंडित सुरू ठेवण्याचा संकल्प केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)