…अन्‌ आजोबा झाले पदवीधर

पिंपरी – शिक्षणाला वय नसते, असे म्हटले जाते. भोसरीमधील कामगार नेते कारभारी पुंडे यांनी वयाच्या साठव्या वर्षी मुक्त विद्यापीठातून पदवीधर होण्याचे स्वप्न पुर्ण केले.

कारभारी गुलाबराव पुंडे हे मुळचे शिरूर तालुक्‍यातील कान्हुर मेसाई या गावचे शेतकरी कुटुंबातील आहेत. मिळेल ते शेतकाम करुन त्यांनी इयत्ता नववीपर्यंतचे शिक्षण घेतले. परिस्थितीअभावी त्यांना नियमितपणे शाळेत जावून शिक्षण घेता आले नाही. मात्र, त्याचे रडगाणे त्यांनी कधीही गायले नाही. बहिस्थ पद्धतीने मुक्त विद्यापीठात प्रवेश घेवून त्यांनी शिक्षणाचे स्वप्न पुर्ण केले. 2014-15 मध्ये त्यांनी बारावीची परिक्षा बहिस्थ पद्धतीने केली. त्यामध्ये त्यांना डिस्टींक्‍शनमध्ये 81 टक्के गुण मिळाले.

भोसरीतील फजेता फोर्जिंग कंपनीतील कामगार संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. कंपनी बंद पडल्यानंतर कामगारांना त्यांची देणी मिळावी यासाठी गेली अनेक वर्षे कामगारांच्या वतीने ते न्यायालयात लढा देत आहेत. कामगारांचे बचाव प्रतिनिधी म्हणूनही ते अनेकदा न्यायालयात उभे राहिले. त्यासाठी पाच वर्षे त्यांनी अभ्यासही केला. राज्य शासनाने त्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने गौरविले आहे.

कामगारांना आर्थिक सक्षम करण्यासाठी त्यांनी फतेजा फोर्जिंग पतसंस्थेची उभारणी केली. दोनदा अपघात झाल्याने त्यांना अपंगत्व आले. मात्र, नैसर्गिक उपचाराद्वारे त्यावर मात करताना त्यांनी आयुर्वेदाचा अभ्यास केला. आता ते इतरांवर निसर्गोपचार करतात. हे करत असतानाच त्यांनी नाशिकच्या मुक्त विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्स विषयात बीएची पदवी घेतली. पुढे कायद्याचे शिक्षण घेण्याचा त्यांचा मानस आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)