#अन्वयार्थ: गैरप्रकारांना चाप लागणार? (भाग २)

#अन्वयार्थ: गैरप्रकारांना चाप लागणार? (भाग १)

मोहन एस. मते 

निवडणुका मग त्या कोणत्याही असोत किती सर्रास पैसा वाटला जातो हे सर्वश्रुत आहे. म्हणूनच काळ्या पैशाची निर्मिती आणि भ्रष्टाचार रोखायचा असेल तर स्थानिक स्वराज्य, संस्थाच्या निवडणुकांपासून ते लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमधील सुधारणांची आवश्‍यकता सर्वच राज्यांनी स्वीकारणे फार महत्त्वाचे आहे. राजकीय क्षेत्रामध्ये येणारा काळा पैसा तितक्‍याच कठोरतेने थांबवावा लागेल. यासाठी लोकशाही व्यवस्था मजबूत करायला हवी. यामध्ये संसद, कार्यपालिका आणि न्यायव्यवस्थेचा समावेश होतो.
भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाचा स्रोत म्हणजे या देशातील सार्वजनिक निवडणुका आहेत. ही गोष्ट देखील भारताला आणि त्यातील सर्व राज्यांना म्हणजेच भारताच्या गरिबीला प्रोत्साहन देणारीच ठरते. कारण ज्या समाजासाठी हा पैसा वापरला जायला हवा त्याच्या ऐवजी तो काही मूठभर राजकारण्यांच्या सत्ता उत्सवासाठी उधळला जातो. परिणामी देशाचा 60 ते 65 टक्के भाग अजूनही मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे.
पूर्वी गरीब पैसे घेऊन मतदान करायचे अशी चर्चा असायची; पण आता काही-शिकलेली सुशिक्षित, दोनपेक्षा अधिक वेळा पोटभर जेवणारी कुटुंबेही पैसे घेतात असे जाहीरपणाने सांगितले जाते. आपण पैसे घेऊन मतं दिले तर जिंकलेला उमेदवार त्या पैशाची वसुली करण्यासाठी काहीही करेल हे उघडच आहे. म्हणूनच जनतेचे हित जपणारे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघाचा विकास करणारे, मतदारांना सोयी-सुविधा देणारे, खेड्यापाड्यांचा, वाडी-वस्तीचा कायापालाट करू पाहणारे उमेदवार सत्तेत असणे हे प्रामाणिक मतदारांचे कर्तव्य आहे. हे प्रामाणिक दृष्टीने घडल्यास निश्‍चितच सत्तेत चांगली माणसे येण्यास मदत होईल.
यासाठी स्वत:च्या पैशाचा स्वार्थ मतदाराने सोडणे अत्यंत आवश्‍यक आहे. मतदान हे दान आहे. ते दान हे सत्पात्री पडावे लागते. भ्रष्ट स्वार्थी, लोकांना मतदान करणे चुकीचे आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जातो. वस्तुत: लोकशाही ही शांततामय रीतीने मतपेटीद्वारे सतांत्तर घडवून आणणारी शासनपद्धती म्हणून ओळखली जाते. दरडोई एक मत या आधारावर कोणत्या पक्षाला बहुमत मिळाले हे ठरवले जाते. म्हणूनच भयमुक्त आणि खुल्या वातावरणात मतदान पार पाडणे आवश्‍यक असते. बहुसंख्य मतदारांच्या पसंतीचे सरकार सत्तेवर येणे हे नियमितपणे घडणे, लोकशाहीच्या स्थैर्यासाठी आवश्‍यक असते. राज्य निवडणूक आयोगाने, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत चालणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उचलेले पाऊल ही एक ऐतिहासिक घटना आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)