अन्यायाला विरोध करण्यासाठी बाळासाहेबांनी मला पुढाकार दिला- शरद पवार

मुंबई: बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ‘ठाकरे’ चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात चांगलीच गप्पांची मैफिल रंगली, दरम्यान शरद पवार यांनी बाळासाहेबांच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.

साध्या कार्यकर्त्यालासुद्धा सोबत घेऊन त्याला मोठं करण्याचं स्वप्न बाळगणारं बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या शिवाजी पार्कातल्या पहिल्याच सभेस मिळालेला प्रचंड प्रतिसाद अजूनही डोळ्यांसमोर असल्याचे शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब बेधडक होते, त्यांचं मत ते स्पष्ट मांडायचे. सीमाभागात मराठी बांधवांवर झालेल्या अन्यायाला विरोध करण्यासाठी ठाकरे यांनी मला पुढाकार दिला होता. त्यात मला दुखापत झाली हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)