अन्यथा, सावता परिषद आंदोलन छेडणार

शेवगाव – औरंगाबाद (पूर्व) मतदार संघाचे आमदार अतुल सावे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या माथेफिरूविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करावी. अन्यथा सावता परिषदेच्या वतीने शेवगावचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. कठोर कारवाई न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराही दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आ.अतुल सावे यांना संभाजीराजे भोसले या फेसबुक अकाऊंटवरून जीवे मारण्याची धमकी देण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. लोकप्रतिनिधीला उघडपणे जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार अतिशय गंभीरस्वरूपाचा व निंदनीय आहे. राज्यभरातील माळी समाजामध्ये अत्यंत संतप्त व उद्रेकी भावना निर्माण झाल्या आहे.
त्यामुळे या माथेफिरू व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करून कठोर शिक्षा करावी. तसेच या फेसबुक पोस्टवर आक्षेपार्ह कॉमेंट करणाऱ्या व लाईक करणाऱ्या विरोधातही गुन्हे नोंदवावेत. अन्यथा, राज्यभरातील माळी समाज सावता परिषदेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही निवेदनात दिला आहे.
या निवेदनावर सावता परिषदेचे प्रदेश महासचिव मयुरराजे वैद्य, प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब चेडे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सुसे तसेच भारत अभंग, सचिन वैद्य, राजेंद्र बनसोडे, अशोक साखरे, संतोष भुजबळ, गणेश रांधवणे, कानिफनाथ साखरे, सचिन आधाट आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी अनेक माळी समाज बांधवांची उपस्थिती होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)