…अन्यथा मेट्रोचे काम बंद पाडणार!

नगरसेविका आशा शेंडगे : मेट्रो स्टेशनचा आराखडा बदलण्याची मागणी

पिंपरी – पिंपरीतील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर चौकात मेट्रोचे स्टेशन बांधले जाणार आहे. त्यामुळे अहल्यादेवी होळकर पुतळ्याचा दर्शनी भाग झाकला जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणीचा मेट्रो स्टेशनचा आराखडा बदलण्यात यावा, अन्यथा सोमवारपासून (दि. 19) मेट्रोचे काम बंद पाडण्यात येईल, असा इशारा भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांच्यासह आणखी काही संघटनांनी दिला आहे.

या संदर्भात पुणे मेट्रो रेल कार्पोरेशनचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम यांना पत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये भाजप नगरसेविका शेंडगे यांच्यासह श्रीमंत मल्हारराव होळकर प्रतिष्ठान, कर्मयोगिनी अहल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, राष्ट्रमाता अहल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर उत्सव कमिटी, पुण्यश्‍लोक अहल्यादेवी सेवा संघ, सांगवी आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांचा समावेश होता.

याबाबत याबाबत पुणे मेट्रो कार्पोरेशनचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम्‌ यांना निवेदन देण्यात आले आहे. नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे यांच्यासह श्रीमंत मल्हारराव होळकर प्रतिष्ठान, कर्मयोगिनी अहल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, राष्ट्रमाता अहल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर उत्सव कमिटी, पुण्यश्‍लोक अहल्यादेवी सेवा संघ सांगवी आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, फुगेवाडी येथील साईट कार्यालयामध्ये 4 सप्टेंबर रोजी मेट्रो अधिकाऱ्यांशी बैठक घेतली होती. यावेळी अधिकाऱ्यांनी पुतळ्याला कोणतीही बाधा पोहचणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतु सध्याच्या मेट्रोच्या आराखड्यावरून यामध्ये काहीही सुधारणा किंवा दुरूस्ती केल्याचे साईटवरील कामावरून दिसून येत नाही. सध्याच्या आरखड्यानुसार अहल्यादेवी होळकरांचा पुतळा स्टेशनच्या पिलरमुळे झाकला जाणार आहे.

यामुळे पुतळ्याच्या सौंदर्यामध्ये बाधा येणार आहे. तसेच समाजाच्या प्रेरणास्थळ काही अंशी कायमस्वरूपी झाकले जाणार आहे. अशा प्रकारे समाजाच्या भावना दुखविण्याचा प्रकार जाणून-बुजून केला जात आहे. तसेच महापालिका इमारतीचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी अहल्यादेवी होळकर यांचा पुतळा झाकण्याचा खटाटोप असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आराखडा बदलून मेट्रो स्टेशन अहिल्यादेवी होळकर चौकालगत एम्पायर इस्टेट पुलाच्या बाजूला स्थलांतरीत करण्यात यावे, अंतिम निर्णय होईपर्यंत मेट्रोचे काम बंद करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

महामेट्रोने नियोजन करताना या गोष्टींचा विचार केला नाही. त्यामुळे हा अडथळा निर्माण झाला असून त्यांनी तातडीने तोडगा न काढल्यास काम बंद करण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे महामेट्रोने पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याबाबत तातडीने अंतिम आराखडा सादर करावा.
– आशा शेंडगे, नगरसेविका, भाजप.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)