… अन्यथा महापालिकेत डुक्‍कर सोडू !

वाकड – देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू असताना थेरगावमधील गणेशनगर, गुजरनगर या परिसरात घाणीचे साम्राज्य प्रचंड वाढले आहे. यामुळे येथे डुक्‍कर, डास, माशांचे प्रमाण अत्याधिक वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन काहीही करत नसल्याने स्थानिक नगरसेवकाने इशारा दिला आहे की, डुकरांचा कायमचा बंदोबस्त न केल्यास सगळी डुकरे पकडून महापालिका भवनात आणि आयुक्‍तांच्या बंगल्यात आणून सोडू.

थेरगाव, गणेशनगर, गुजरनगरमधील नागरिकांना सध्या वेगळ्याच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या परिसरात डुकरांचे प्रमाण वाढल्याने, रस्त्याने जाताना त्रास तर होतोच मात्र कचराकुंडीतील कचरा अस्ताव्यस्त होत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पाऊस पडल्यानंतर सखल भागात चिखल करून राहण्याच्या डुकरांच्या सवयीमुळे ठिक-ठिकाणी त्यांचे अधिवास निर्माण होऊ लागले आहेत. डुकरांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्थानिक नगरसेवक ऍड सचिन भोसले यांनी दैनिक “प्रभात’ शी बोलताना सांगितले की, मागील अनेक दिवसांपासून मी पालिका आयुक्‍त तसेच संबधित विभाग यांना निवेदन देऊन पाठपुरावा करत आहे. सभागृहात देखील अनेक वेळा या समस्येबद्दल प्रश्‍न उपस्थित केला मात्र प्रशासन जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहे . ऐन पावसाळ्यात परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे, डुकरांचे प्रमाण अधिक वाढल्याने लहान मोठे अपघात तर नित्याचेच झाले आहेत. प्रामुख्याने कचराकुंडी भोवताली डुकरांचे प्रमाण अधिक असते. ओला-सुका कचरा, शिळे अन्न पदार्थ अस्तव्यस्त होत असतात. यामुळे सर्वत्र घाण आणि प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. डासांचे प्रमाण सुद्धा कमालीचे वाढले आहे, त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्‍यता आहे. पावसाळा असल्याने प्रशासनाने या समस्येला वेळीच गांभिर्याने घेणे गरजेचे आहे, मात्र तसे होताना दिसत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)