…अन्यथा भारताचा सीरिया होईल

नवी दिल्ली – जर राम मंदिराचा मुद्दा वेळीच सोडवला नाही तर भारताचा सीरिया होईल अशी भीती आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केली आहे. जर मुस्लिमांनी राम मंदिराचा मुद्दा सोडला नाही तर भारताचा सीरिया झालेला आपल्याला बघायला मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले. सध्या रवि शंकर या प्रकरणाशी संबंधित अनेकांच्या भेटी घेऊन कोर्टाबाहेर सामोपचारानं हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सीरियामध्ये सत्तारूढ अध्यक्ष बशर अल असद यांच्या सरकारविरोधात गेली आठ वर्षे बंडखोरांनी युद्ध छेडले असून प्रचंड प्रमाणात संहार झाला आहे. सीरियाचे उदाहरण देताना रवि शंकर यांनी मुस्लीमांनी अयोध्येवरचा दावा सोडावा असा सल्ला दिला आहे. अयोध्या ही जागा ही मुस्लीमांसाठी श्रद्धास्थान नाही, त्यामुळे त्यांनी सद्भावनेतून अयोध्येवरचा दावा सोडावा असं रवि शंकर म्हणाले आहेत.

-Ads-

वादग्रस्त जागेवर प्रार्थना करण्यास इस्लाममध्ये मनाई असल्याचा दाखला त्यांनी दिला आहे. तसेच, प्रभू रामचंद्रांचं जन्मस्थान आम्ही बदलू शकत नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. वादग्रस्त जागेवर हॉस्पिटलसारख्या वास्तू उभारण्यासारख्या सूचनांना रवि शंकर यांनी झिडकारले आहे. प्रभू रामचंद्रांचा जन्म या जागी झाला अशी हिंदूंची श्रद्धा आहे. आम्ही प्रभू रामचंद्रांचं जन्मस्थळ बदलू नाही शकत, असे ते म्हणाले.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)