… अन्यथा धुराडी पेटू देणार नाही : राजू शेट्टी

स्वाभिमानीचा इशारा : पहिली उचल 3200 जाहीर करण्याची मागणी 

वडूज  – खटाव तालुक्‍यातील ऊस उत्पादकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली यंदाच्या गळीत हंगामाची पहिली उचल मागण्याचे नियोजन केले आहे. खा. राजू शेट्टी यांनी जयसिंगपुरच्या 17 व्या ऊसपरिषदेत जाहीर केलेल्या सूत्राप्रमाणे खटाव तालुक्‍यातील उसउत्पादकांना पहिली उचल जाहीर करावी, अन्यथा उसाचे टिपरे तोडू दिले जाणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वडूजमध्ये आज गावोगावच्या उसउत्पादकांची बैठक पार पडली. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा जाहीर केला. येत्या एक दोन दिवसात खटावमधील ग्रीन पॉवर शुगर, वर्धन साखर कारखान्यासह आजूबाजूच्या तालुक्‍यातील साखर कारखाने सुरू होतायत. साडेनऊ साखर उतारा बेस गृहित धरून 2750 रुपये आणि 200 रुपये अधिक आणि त्यापुढील प्रत्येक टक्‍क्‍याला 289 रुपये याप्रमाणे 3200 रुपये पहिली उचल द्यावी, त्याशिवाय तोडी सुरू होऊ द्यायच्या नाहीत, असा ठराव यावेळी करण्यात आला. ऊस उत्पादकांनीही कारखानदार पहिली उचल जाहीर करेपर्यंत तोडी घेऊ नयेत, मात्र कारखानदारांनी बगलबच्च्याच्या मदतीने जबरजस्तीने ऊसतोडी सुरु केल्या तर स्वाभिमानी स्टाइलने धडा शिकवला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

गेल्या हंगामातील फरकाचे 400 रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, तसेच गेल्या हंगामातील थकित एफआरपीचे व्याजही या फरकबरोबर मिळावे अशी मागणी करण्यात आली. साखर कारखानदारांनी प्राधान्याने कार्यक्षेत्रातील ऊस तोडणीचा कार्यक्रम कारखान्याने राबवावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी राज्य प्रवक्ते अनिल पवार, तानाजी देशमुख, तालुकाध्यक्ष सूर्यकांत भुजबळ, जिल्हा संघटक श्रीकांत लावंड, प्रमोद देवकर, राजू फडतरे, सचिन निकम, शरद निकम, नितीन शिंदे यांच्यासह अनेक ऊसत्पादक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)