अन्यथा जमिनीत गाडून घेऊन आंदोलन- ऍड.गायकवाड

श्रीगोंदे – चालू वर्षी पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांपुढे अनेक संकटे उभी राहिली आहेत. जनावरांचा प्रश्न देखील बिकट होण्याची शक्‍यता आहे. बाजारपेठ ही शेतकऱ्यांवर आधारलेली असून दुष्काळी परिस्थितीचा फटका बाजारपेठेस देखील बसणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता शासनाने श्रीगोंदा तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा सोमवारी (दि.22) तहसिल कार्यालयासमोर जमिनीत गाडून घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी दिला आहे. या संदर्भात गायकवाड यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मागील वर्षी 50 पैसे पेक्षा जास्त आणेवारी दाखविल्याने कोणत्याही योजनांचा फायदा श्रीगोंदा तालुक्‍यासह मिळाला नाही.यावर्षी 50 पैसे पेक्षा कमी आणेवारी दाखविण्याच्या सूचना कामगार तलाठ्यांना करण्यात यावा,आपल्या मागण्या मान्य न झाल्यास वरील आंदोलन आपण करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)