…अन्यथा आगामी निवडणुकांवर बहिष्कार

मरकळकरांचा ग्रामसभेत ठराव : भामा आसखेड बाधितांच्या सात-बारावरील शिक्के उठवण्याची मागणी

चिंबळी- मरकळ (ता. खेड) गावाला भामा-आसखेड धरणाचा पाण्याचा लाभ होत नाही, त्यामुळे प्रकल्पग्रस्तानाच्या पुनवर्सनासाठी जमीन देण्याचा प्रश्‍नच नाही. यामुळे गावातील बाधितांचे सात-बारा वरील शिक्के उठवा, अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन व आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा माजी सरपंच दशरथ लोखंडे यांनी ग्रामसभेत दिला.
मरकळ ग्रामपंचायतीच्यावतीने आज (ग्रामसभा) आयोजित केलेल्या ग्रामसभेत भामा-आसखेड प्रकल्पाचे मरकळ येथील पुनर्वसन रद्द करण्याचा ठराव घेण्यात आला. यावेळी ग्रामसभेत गावातील बाधित शेतकऱ्यांनी म्हणणे मांडले, त्यावेळी बोलताना लोखंडे यांनी हा इशारा दिला आहे. दरम्यान, ग्रामसभेत अध्यक्षस्थानी सरपंच तृप्ती लोखंडे, उपसरपंच लाला लोखंडे, सदस्य रोहिदास लोखंडे, सचिन लोखंडे, गणेश लोखंडे, नवनाथ लोखंडे, राजाराम लोखंडे,किरण लोखंडे, ग्रामविकास अधिकारी विश्‍वास मागाडे, सोसायटी अध्यक्ष संतोष भुसे, सुरेश ढगे, स्वप्निल लोखंडे, बालाजी जंगले, संतोष लोखंडे व सर्व क्रमचारी वर्ग तसेच आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
पुनर्वसनासाठी गावातील 72 शेतकरी बाधित होत असून 94 हेक्‍टरर क्षेत्रावर पुनर्वसनाचे शिक्के पडले आहेत. शिक्के टाकताना शेतकऱ्यांना विश्‍वासात घेतलेले नाही. भामा-आसखेड प्रकल्प अंतर्गत मरकळमध्ये कुठल्याही प्रकारचे कालव्याचे खोदकाम अथवा बांधकाम झालेले नाही. भामा-आसखेड धरणाचा एकही थेंब गावातील शेतीला मिळत नाही. त्यामुळे मरकळ गाव लाभ क्षेत्रात येत नाही. कायद्यानुसार शासनाला पाच वर्षांमध्ये जर जमिनी संपादित केल्या तर पाच वर्षांच्या कालावधीत त्या जमिनी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना देऊन ज्यांच्या जमिनी घेतल्या आहेत त्यांना योग्य मोबदला द्यावा लागतो; परंतु असा मोबदला आजतागायत कोणत्याही शेतकऱ्यांना मिळाला नाही व भविष्यात देखील कोणत्याही पुनर्सवरसित शेतकरी तो स्वीकारणार नाही. बाधित गेले 30 वर्षे याकरिता पाठपुरावा करीत आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीवर पुनर्वसनाचे शिक्के असल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे पीक कर्ज व सोसायटी कर्ज मिळत नाही, तसेच खातेफोड देखील होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे हा प्रश्‍न तत्काळ मार्गी लावावा अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली.

  • या विषयांवर चर्चा, ठराव
    मरकळ ग्रामसभेत चौदावा वित्त आयोग विविध विकास कामे, समाज कल्याण वैयक्तिक लाभाच्या योजना,10टक्के महिला व बालकल्याण वैयक्तिक लाभाच्या योजना,अनुसूचित जाती – जमाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे आराखडा तयार करणे,शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविणे, 2019-20 चे अंदाज पत्रक जमा करणे, सहामाही जमाखर्च मंजुरी देणे आदी विषयांवर चर्चा व ठराव घेण्यात आले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)