अन्यथा अवमानाचा गुन्हा दाखल करु!

पिंपरी – निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात 15 ऑगस्टपर्यंत राष्ट्रध्वज लावला नाही तर महापालिका आयुक्तांवर राष्ट्रध्वज अवमानाचा गुन्हा दाखल करु, असा इशारा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिला आहे.

दत्ता साने यांनी यासंबंधी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादीच्या काळात शहराची शान म्हणून भक्ती-शक्ती चौकात देशातील सर्वांत उंच असा 107 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज 26 जानेवारी 2018 रोजी उभारण्यात आला. मात्र उंचीवरील वेगवान वाऱ्यामुळे हा ध्वज फाटला.

-Ads-

त्यानंतर महापालिकेने नागरिकांच्या वारंवार मागणीनंतरही आजतागायत तो राष्ट्रध्वज पुन्हा बसवला नाही. शहराची नवी ओळख निर्माण व्हावी यासाठी हा ध्वज उभारला गेला. पर्यटकांसाठी सुद्धा ते एक आकर्षण ठरणार होते. मात्र वारी दरम्यान शहरातून राज्य भरातचील वारकरी भेट देऊन गेले त्यांनाही तो ध्वज दिसला नाही. त्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. शहरवासीयांकडूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासानाने शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा राष्ट्रध्वज स्वातंत्र्य दिनी पुन्हा फडकवावा. त्यामुळे नागरिकांचीही नाराजी दूर होईल, असे साने यांनी म्हटले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)