अन्न सुरक्षेऐवजी आता पोषण सुरक्षेकडे लक्ष द्यावे लागेल: डॉ. एम. एस. स्वामीनाथन

डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली: देशाने आपला फोकस आता अन्न सुरक्षेच्या ऐवजी पोषण सुरक्षेकडे वळवला पाहिजे अशी अपेक्षा प्रख्यात कृषी वैज्ञानिक आणि हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे. केवळ कॅलरीज, प्रोटिन्स यांच्याकडे लक्ष देण्याखेरीज आता आपल्याला नागरीकांच्या मायक्रोन्युट्रिएन्टस कडेही लक्ष देण्याची गरज आहे असे त्यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की आपल्याला सुदृढ माता आणि सुदृढ बालके हवी असतील तर तीन प्रकारच्या भुकेपासून आपल्याला मुक्ती मिळवली पाहिजे. प्रोटीन्सच्या अभावामुळे निर्माण होणारी प्रोटिनची भूक, पुरेशा उष्मांकाची म्हणजेच कॅलरीजची भूक आणि आयोडिन आणि आर्यन सारख्या मायक्रोन्युट्रिएन्टसची भूक या तीन भूकांपासून आपल्या नागरीकांना मुक्त केले पाहिजे. कृषी, आरोग्य आणि पोषण हे तीन्ही घटक एकमेकांना पुरक असल्याने त्या तिन्हींच्या एकत्रिकरणातूनच नागरीकांच्या पोषण आणि उत्तम आरोग्याचा प्रश्‍न सोडवता येऊ शकतो.

आता केवळ आपल्याला नुसत्या अन्न सुरक्षेवर अवलंबून राहुन चालणार नाही असे ते म्हणाले. बाल विकार आणि कुपोषण या विषयीच्या एका राष्ट्रीय चर्चासत्रात दिलेल्या व्हिडीओ संदेशात त्यांनी ही भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना कृषी विभागाचे अतिरीक्त आयुक्त के पी वासनिक म्हणाले , की कुपोषणाच्या उपचारावर येणारा खर्च हा प्रत्यक्ष कुपोषण प्रतिकारक उपाययोजनेपेक्षा तब्बल 27 पट अधिक आहे. त्यामुळे मानवाच्या आरोग्यदायी विकासासाठी सर्वच घटकांनी कुपोषणाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी एकत्रितपणे कार्य केले पाहिजे. देशाच्या कृषी क्षेत्राकडे नागरीकांच्या कुपोषणाचा व रोजगाराचा तसेच दारिद्रयाच्या निर्मुलनाचा प्रश्‍न सोडवण्याची क्षमता आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)