अन्न, पाण्याविना चिंकारांची तडफड

दुष्काळाच्या झळा : खाण्यासाठी गवतही मिळेना


चिंकारांना वाचवायचे कसे?: वनविभाग चिंतेत

पुणे – कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या झळा वन्यप्राण्यांना बसत आहेत. अन्न आणि पाण्याच्या अभावी जिल्ह्यातील हजारो चिंकारा अशक्‍त होत असून, जगण्यासाठी त्यांना रोजच झगडावे लागत आहे. अन्न आणि पाण्याविना मृत्युच्या दारात पोहचलेल्या या चिंकारांना वाचवायचे कसे? अशी चिंता वनविभागाला सतावत आहे.

राज्यात यंदा परतीच्या पावसाने बगल दिल्याने, नोव्हेंबर अखेरपासूनच दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. जिल्ह्यातही अनेक गावांमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात अनेक गावांमध्ये सध्या टॅंकरने पाणी पुरविण्यात येते अशावेळी जिथे माणसांनाच पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही, तिथे जनावरांसाठी पाणी आणायचे कुठून? इतकेच नव्हे तर कमी पावसामुळे यंदा या चिंकारांना गवतही उपलब्ध नसल्याने त्यांची भूक भागवायची कशी, असा प्रश्‍न वनविभागासमोर निर्माण झाला आहे.

याबाबत पुणे वनविभागच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए. म्हणाल्या, “जिल्ह्यातील चिंकारांची अवस्था ही अतिशय बिकट झाली आहे. तृणभक्षी या प्रकारातील प्राणी असलेल्या चिंकारा गवत आणि पाण्याच्या अभावामुळे अशक्त झाले आहेत. नेहमीसारखी चपळता त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. या प्राण्यांच्या रक्षणासाठी विभागाने काही ठिकाणी पाणवठे आणि गवत लावणी केली आहे. मात्र त्याचा फारसा प्रभाव होताना दिसत नाही. त्यामुळे आगामी काळ हा चिंकारांसाठी अतिशय बिकट असणार असून, यामध्ये त्यांना जगवायचे कसे याची चिंता आम्हाला सतावत आहे.’ या परिसरात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी स्थानिक कार्यकर्ते, शेतकरी, विविध संस्था आणि शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील चिंकारांची संख्या 
इंदापूर : 1,500
बारामती : 1,000
दौंड : 1,500
(वनविभागाच्या आकडेवारीनुसार)

याही प्राण्यांवर दुष्काळाचे सावट :
ससे, मोर, तरस, लांडगा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)