अन्नू कपूर यांचे झी टीव्हीवर पुनरागमन

झी टीव्हीवरील नावाजलेला कार्यक्रम अंताक्षरीचे १३ वर्ष सूत्रसंचालन केल्यानंतर ह्या कार्यक्रमाचे मूळ आणि सदाबहार सूत्रसंचालक अन्नू कपूर पुन्हा एकदा झी टीव्हीवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी परत येत आहेत. दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या झी रिश्ते अॅवॉर्ड्‌स २०१८ साठी तुमच्या आवडत्या झी टीव्ही सिताऱ्यांमधील अंताक्षरी स्पर्धेचे सूत्रसंचालन अन्नूजी करताना दिसून येतील.

२६ वर्षांपासून झी टीव्ही आपल्या प्रेक्षकांचे असमांतर कॉन्टेन्ट, संस्मरणीय कथा आणि आपल्याशा वाटतील अशा व्यक्तिरेखांसह मनोरंजन करत आहे. ह्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आयुष्याचा हिस्सा बनल्या असून त्यांच्या आनंदात प्रेक्षक हसले आहेत तर त्यांच्या दुःखात रडलेही आहेत.

-Ads-

भारतात टेलिव्हिजन हा लोकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे. आता ह्यावेळेस वाहिनी आपल्या प्रेक्षकांसोबत एक अतूट नाते निर्माण करणार आहे. वाहिनीचे सच्चे चाहते, वास्तविक आयुष्यातील एक जोडी प्रिया सिंग आणि सन्नी कक्कर हे ह्या पुरस्कार सोहळ्‌याच्या दरम्यान विवाहबद्ध होतील. बरेलीच्या ह्या भाग्यवान जोडीचे बिग फॅट वेडिंग होणार असून त्यांच्या लग्नाआधीचे सोहळेसुद्धा खूप धूमधडाक्यात साजरे केले जातील. ह्या जोडीचा संगीत सोहळा नुकताच अख्ख्या झी टीव्ही परिवाराच्या उपस्थित आयोजित करण्यात आला होता आणि त्यानंतर दिग्गज सूत्रसंचालक अन्नू कपूर यांनी अंताक्षरीचे सूत्रसंचालन केले. त्यांनी लडकेवाले आणि लडकीवाले यांना काही ब्लॉकबस्टर गाणी गायला लावली. ह्या एपिसोडच्या वेळेस झी कुटुंबातील गायन कला पाहून अन्नूजी अगदी थक्कच झाले. ह्या कलाकारांनी आपल्या अफलातून परफॉर्मन्सेससह काही अविस्मरणीय क्षण निर्माण केले.

ह्यानिमित्ताने झी टीव्हीसोबतच्या सहकार्याबद्दल अन्नू कपूर म्हणाले, “झी टीव्ही म्हणजे अगदी घरी परतण्यासारखे आहे. झी रिश्ते अॅवॉर्ड्‌सच्या संगीत सोहळ्‌याचा हिस्सा बनताना मी खूपच उत्साहात आहे आणि अनेक वर्षांनंतर अंताक्षरीचे सूत्रसंचालन करताना मी खूप आनंदात आहे. ह्या शोसोबत मी दीर्घ काळापासून जोडलेला असून हा शो पुन्हा एकदा वाहिनीवर आणण्यासाठी आम्ही काम करत आहोत, त्यामुळे प्रेक्षकांना त्यांचा आवडता शो पुन्हा एकदा पाहायला मिळेल. लग्न आणि संगीत हे एकसाथच असतात आणि नुकतेच ह्या कलाकारांसोबत अंताक्षरीसाठी चित्रीकरण करायला मला खूप मजा आली. जुने दिवस आठवले आणि मी अगदी तशीच धमाल केली.”

लोकप्रिय झी टीव्ही कलाकार अभिषेक कपूर (कुंडली भाग्य), शिखा सिंग (कुंडली भाग्य), मोनिका सिंग (इश्क सुभान अल्ला), विनय जैन (इश्क सुभान अल्ला), सेहबान अझिम (तुझसे है राबता), रीनी ध्यानी (ये तेरी गलियां) आणि असेच अनेक सितारे ह्या संध्येमध्ये सामिल झाले होते आणि त्यांनी सर्वांचे उत्तम मनोरंजन केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)