अन्नधान्य, फळे आणि भाजीपाल्याचे दर घसरले 

आगामी काळात महागाई दर कमी पातळीवर राहणार 

नवी दिल्ली: घाऊक किमतीच्या आधारावरील महागाईचा दर काही प्रमाणात वाढला आहे. मात्र क्रुडचे दर आता 65 डॉलर प्रति पिंपापर्यंत खाली आल्यामुळे महागाई वाढण्याची शक्‍यता कमी असल्यामुळे व्याजदरात वाढ होण्याची शक्‍यता कमी असल्याचे समजले जात आहे.

-Ads-

सरकारने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ऑक्‍टोबर महिन्यातील घाऊक महागाईचा दर वाढून 5.28 टक्‍के इतका झाला आहे. ही या दराची चार महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे. या महिन्यात इंधनाचे दर जास्त होते त्यामुळे महागाईचा दर वाढला होता. मात्र आता इंधनाचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे महागाईचा दर वाढण्याची शक्‍यत ाकमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यात या महागाईचा दर 5.13 टक्‍के इतका होता. त्यात ऑक्‍टोबर महिन्यात फारशी वाढ झाली नसल्याचे दिसून येते.

ऑक्‍टोबर महिन्यात इंधनाचे दर जास्त होते. त्यामुळे त्याचा महागाईवर काही प्रमाणात परिणाम झाला असल्याचे दिसून येते. मात्र आता इंधनाचे दर कमी झाल्यामुळे आगामी काळात महागाई कमी पातळीवर राहण्याची शक्‍यता वाढली आहे. ऑक्‍टोबर महिन्यात अन्न आणि भाजीपाल्याचे दर कमी होते. तसेच त्या आगामी काळात वाढ होण्याची शक्‍यता कमी आहे. रिझर्व्ह बॅंकेचे पतधारण आता 5 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यावेळी या आकडेवारीवर विचार केला जाणार आहे. व्याजदर ठरविताना रिझर्व्ह बॅंक किरकोळ किमतीवरील महागाईचा जास्त विचार करीत असते. किरकोळ आणि घाऊक दरावरील महागाई 5 टक्‍क्‍याच्या आत आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नसल्याचे विश्‍लेषकांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)