अन्नधान्य आणि फळांच्या किमती वाढल्या 

नवी दिल्ली – मे महिन्यातील किरकोळ महागाईचा दर सरकारने आज जाहीर केला. त्यानुसार मे महिन्यात किरकोळ महागाई वाढून 4.87 टक्‍के झाली आहे. काही अन्नधान्याचे दर वाढल्यामुळे या महागाईत वाढ झाली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. एप्रिल महिन्यात या महागाईचा दर 4.58 टक्‍के होता तर गेल्या वर्षात मे महिन्यात या महागाईचा दर केवळ 2.18 टक्‍के इतका होता. याचा अर्थ महिन्याच्या आणि वार्षिक पातळीवरही ही महागाई वाढली आहे. त्याचबरोबर आगामी काळातही वाढण्याची शक्‍यता असल्यामुळे गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात पाव टक्‍क्‍यानी वाढ केली आहे. आणखी महागाई वाढण्याची शक्‍यता असल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेला आणखी एकदा व्याजदरात वाढ करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मे महिन्यात अन्नधान्याची महागाई 3.10 टक्‍क्‍यानी वाढली आहे. जी की एप्रिल महिन्यात 2.8 टक्‍क्‍यांनी वाढली होती. या महिन्यात ऊन जास्त असल्यामुळे भाजीपाला आणि फळे महाग होतात. पाऊस चांगला पडल्यानंतर या वस्तूचे दर कमी होण्याची शक्‍यता वाढते. क्रूडचे वाढलेले दर आणि घसरत असलेल्या रुपयामुळे महागाई वाढत राहण्याची शक्‍यता गृहीत धरून रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर इतर व्यावसायिक बॅंकांनीही त्यांच्या कर्ज आणि ठेवीवरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)