अनौपचारिक अर्थव्यवस्थेकडून औपचारिक अर्थव्यवस्थेकडे भारताचा प्रवास : मोदी 

जपानमध्ये पंतप्रधान मोदींनी मेक इन इंडिया चर्चासत्राला पंतप्रधानांचे संबोधन

नवी दिल्ली: भारत आज सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. डिजिटल व्यवहार, वस्तू आणि सेवा कर तसेच अनौपचारिक अर्थव्यवस्थेकडून औपचारिक अर्थव्यवस्थेकडे भारताचा प्रवास झाला आहे. भारताची विकसित होणारी अर्थव्यवस्था, वेगाने वाढणारा मध्यम वर्ग आणि वाढती तरुण लोकसंख्या यामुळे जपानी गुंतवणुकदारांना अनेक नव्या संधी उपलब्ध होत आहेत असे पंतप्रधान म्हणाले. जपानमधल्या टोकिओ येथे आयोजित मेक इन इंडिया: आफ्रिकेतील भारत-जपान भागीदारी आणि डिजिटल भागीदारी या विषयावरील चर्चासत्राला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.

भारतीय समुदायाची संवाद 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टोकिओ येथे भारतीय समुदायाच्या लोकांशी संवाद साधला. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारत-जपान सहकार्याच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. पंतप्रधान मोदी यांनी जपानमधल्या भारतीय समुदायाला दिवाळीनिमित्त शुभेच्छाही दिल्या.भारतीय समुदाय जपानमधील भारताचे राजदूत आहेत. भारतात गुंतवणूक करावी तसेच मातृभूमीशी सांस्कृतिक संबंध जोडून ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. भारत नेहमीच भारतीय उपाययोजना आणि जागतिक उपयोग या उद्देशाने कार्य करत आहे. भारताचा अत्यंत यशस्वी ठरलेला अंतरीक्ष कार्यक्रम आणि भारतात निर्माण होणाऱ्या मजबूत डिजिटल पायाभूत सोई यांचा पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला. मेक इन इंडिया कार्यक्रमामुळे भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि वाहन निर्मितीचे केंद्र बनत आहे.नव भारताच्या निर्मितीसाठी स्मार्ट पायाभूत सुविधा निर्मितीतील जपानचा सहभाग उल्लेखनीय आहे. भारत आणि जपानमधले संबंध सुधारण्यासाठी भारतीय समुदायाने सातत्याने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

व्यवसायात तसेच नागरिकांच्या जीवनमानातील सुलभता अधिक वृद्धींगत करण्यावर सरकार कशाप्रकारे लक्ष केंद्रीत करत आहे हे पंतप्रधानांनी सांगितले. भारतात मोठ्या संख्येने कार्यरत असलेल्या जपानी कंपन्यांबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. गेल्या चार वर्षातील भारताच्या आर्थिक कामगिरीचे सामर्थ्य पंतप्रधानांनी विस्तृतपणे विषद केले.

कमी खर्चिक उत्पादन, माहिती तंत्रज्ञान उद्योग आदी विभागांचा उल्लेख केला. भारत आणि जपानमधल्या समान मूल्यांवरही पंतप्रधानांनी भर दिला. इंडो-पॅसिफिक, दक्षिण आशिया आणि आफ्रिका यासह जगाच्या अन्य भागात मजबूत विकासात्मक भागीदारी करण्याकडे दोन्ही देशांनी पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)