अनैतिक संबंधातून मजुराचा खून

पिंपरी – दगडी खाणीमध्ये आढळलेल्या मजुराच्या खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

धन पठाणी कामी (वय-42, रा. सोनावणे वस्ती, चिखली), खेमराज राणा कामी (वय-25, रा. शिंदे वस्ती, रावेत) व पूजा रामसिंग ढकालवर (वय-25, रा. चिखली) अशी आरोपींची नावे आहेत. विजय प्रल्हाद सोळंकी (वय-40, रा. भांगरे कॉलनी, चिखली) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय व पूजा यांच्यात अनैतिक संबंध होते. तर धन कामी याचे पूजावर प्रेम होते. पूजाने विजयला दगड खाण येथील निर्जनस्थळी भेटण्यासाठी बोलावले. त्यावेळी धन आणि त्याचा चुलत भाऊ खेमराज याने विजय याला गाठून त्याचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळला. त्यांच्या डोक्‍यात दगड घालून खून केला व मृतदेह खाणीमध्ये टाकला. निगडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रघुनाथ भोये तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)