अनैतिक संबंधातून पतीनेच पत्नीचा काटा काढला

कराड, दि. 14 (प्रतिनिधी)- कराड बसस्थानकासमोरील एका इमारतीच्या बंद खोलीत मृतदेह आढळून आलेल्या गर्भवती महिलेचा अनैतिक संबंधातून पतीनेच खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी वेगाने तपासाची सुत्रे हलवून कर्नाटकातून संशयीतास ताब्यात घेतले होते. पत्नीचा खून केल्याची कबुली दिल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. रघू नायक, असे संशयीताचे नाव आहे.
मोनिका रघु नायक ही खून झालेली महिला पती रघूसह कराड बसस्थानकासमोरील इमारतीच्या एका खोलीत रहात होती. तिचा मृतदेह इमारतीच्या खोलीत आढळून आला होता. मोनिकाचा खुन झाल्याचे पोलीस तपासात समोर येताच पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स्वप्नील लोखंडे यांनी तपासाची चक्रे फिरवली. त्या विवाहितेचा खुन तिच्या पतीनेच केल्याचा संशय बळावल्यावर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार राजेंद्र पुजारी, सचिन साळुंखे, सचिन गुरव यांचे पथक कर्नाटकात रवाना झाले. बेल्लुर तालुक्यातील तट्टेली गावात तीन ठिकाणी छापा टाकून संशयिताचा शोध घेतला. मात्र तो पसार झाला होता. त्यानंतर नातेवाईकांकडे केलेल्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार हसन, बेंगलोर, अल्लुर, कृष्णपुरी या भागात पोलिसांनी संशयीताचा अहोरात्र शोध घेतला. सलग चार दिवस कर्नाटकात तळ ठोकून बसलेल्या कराड पोलिसांनी सायबर सेलचे गजानन कदम यांचे सहकार्य घेऊन संशयिताचा शोध सुरू केला. त्यानंतर संशयित हळेबीड येथे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. कर्नाटकातील पथकाला पोलीस उपनिरीक्षक चंदनशिवे, पोलीस नाईक संजय जाधव यांची मदत मिळाली. संशयिताला घेऊन कराडला आल्यानंतर त्याला न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पोलिसांनी संशयिताकडे कसुन चौकशी केल्यावर त्याच्या पत्नीचे एका युवकाशी अनैतिक संबध होते. तो युवक संशयिताचा मित्रच होता. अनैतिक संबध समोर आल्याच्या कारणावरून चिडून संशयिताने पत्नीचा खून केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील तपास करत आहेत. खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांनी कराड शहर पोलिसांचे कौतुक केले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)