अनैतिक संबंधातून खून करणाऱ्या दांपत्याला जन्मठेप

पुणे – अनैतिक संबंधातून गळा आवळून, दगडाने मारून खून करणाऱ्या दांपत्याला जन्मठेप आणि प्रत्येकी 12 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. जिल्हा आणि सत्र न्यायधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा आदेश दिला आहे. दंडापैकी 20 हजार रुपये मयताच्या पत्नीस देण्यात यावेत, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

उदलसिंग भवानीसिंग ठाकुर (वय 32), त्याची पत्नी पूनम (वय 26, दोघेही, रा. जनता वसाहत, मूळ. उत्तरप्रदेश) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. चंद्रीकाप्रसाद मंगलप्रसाद यादव (वय 40, रा. लक्ष्मीनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याचा भाऊ नागेंद्र याने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी 13 साक्षीदार तपासले. परिस्थितीजन्य पुरावा आणि मयताला आरोपीच्या घरात जाताना पाहणाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही घटना 24 सप्टेंबर 2015 रोजी लक्ष्मीनगर येथे घडली. घटनेच्या दिवशी मयत चंद्रीकाप्रसाद हा दुपारी 12.30 च्या सुमारास मुलगी उषा (वय 4) हिस शाळेत सोडविण्यास गेला. तो परत आलाच नाही, म्हणुन मयताच्या पत्नीने पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानंतर मयत आरोपींच्या घरामध्ये आढळून आला. पुनम आणि त्याचे अनैतिक संबंध होते. यातून तिने त्याच्याकडून 30 हजार रुपये हातऊसने घेतले होते. ही रक्‍कम चंद्रीकाप्रसाद वारंवार परत मागत असल्याच्या आणि पूनम बरोबर अनैतिक संबंध ठेवल्याच्या कारणावरून तिने आणि तिच्या पतीने चंद्रीकाप्रसाद याचा खून केला. त्यानंतर हातपाय बांधून त्यावर गादी टाकून मृतदेह बेडरूमध्ये ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. यावर युक्तीवाद करताना दोघांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ऍड. घोगरे पाटील यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने भादवी कलम 302 (खून) नुसार जन्मठेप आणि प्रत्येकी 10 हजार रुपये दंड, भादवी कलम 201 (पुरावा नष्ट करणे) नुसार 1 वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)