अनेक सुपरहीट चित्रपट करूनही लोक मला ओळखत नाहीत…

प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू हिने एका मुलाखतीत म्हंटले आहे की, ‘बॉलीवूडमध्ये अनेक सुपरहीट चित्रपट देऊन देखील लोक मला ओळखत नाहीत.’ बॉलीवूड मधील  अनेक सुपरस्टार कलाकारांसोबत तिने काम केले आहे. तापसीने बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह ‘पिंक’, वरूण धवनसह ‘जुडवा -२’, ऋषी कापूर यांच्यासोबत ‘मुल्क’ , अक्षय कुमारसह ‘बेबी’ या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलेआहे.

तिचा  चित्रपट ‘मनमर्जीया’ नुकताच प्रदर्शीत झाला आहे. त्याच्या प्रमोशनसाठी दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, मी सध्या करियरमध्ये त्या पायरीपर्यंत पोहचले नाही की जेथे वर्षात १-२ चित्रपट करणे योग्य आहे. जोपर्यंत प्रत्येक सिनेप्रेमी मला ओळखणार नाही तोपर्यंत वर्षात अनेक चित्रपट करण्याचे मी सोडणार नाही. मला अजूनही असेच वाटते की, लोक मला खरेच ओळखत नाहीत.

तापसी पुढे म्हणाली, ‘मी जेव्हा स्वतःचा दर्शकवर्ग बनवण्यात सक्षम होईल तेव्हा मी माझ्या आवडीचेच सिनेमे करीन’. माझे लक्ष या पिढीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक होणे आहे.”पिंक’ चित्रपटानंतर मी कोणत्याही चित्रपटाला नाही म्हणू शकले नाही. मला माझ्या  निर्णयांचा कसलाही खेद नाही.”  पिंकीच्या नंतर माझ्या कारकिर्दीत अशी कोणताही चित्रपट नाही आहे की, ‘ज्याच्या निवडीवर मला वाटेल की हा चित्रपट मी केला नसता तर बरे झाले असते.’

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)