अनेक वर्षांपर्यंत शटडाऊन चालू ठेवण्याची आपली तयारी : ट्रम्प यांनी धमकावले विरोधकांना

वॉशिंग्टन: मेक्‍सिको सीमेवर भिंत बांधण्याच्या प्रस्तावाला सरकारी निधी देण्यास विरोधकांनी नकार दर्शवल्यामुळे अमेरिकेत शटडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. गेले दोन आठवडे हा अंशत: शटडाऊनचा प्रकार सुरू असून त्याचा सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तथापि विरोधकांनी आपल्या सीमा भिंतीच्या प्रस्तावाला मान्यता दिली नाही तर पुढील कितीही वर्ष हा शटडाऊन कायम ठेवण्याची आपली तयारी आहे असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. वेळ प्रसंगी आपण या सीमा भिंतीच्या प्रस्तावासाठी अमेरिकेत राष्ट्रीय आणिबाणी घोषित करू आणि हा प्रकल्प तडीला नेऊ अशी ताठर भूमिकाही त्यांनी घेतली आहे.

व्हाईट हाऊस मध्ये आज या शटडाऊनच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्‌यासाठी कॉंग्रेस नेत्यांची एक बैठक बोलावण्यात आली होती. पण त्याही बैठकीत कोणत्याच बाजूने नमते न घेतल्याने पेच प्रसंग सुटू शकला नाही त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला आहे. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की मी शटडाऊन कितीही वर्ष सुरू ठेवण्याची धमकी विरोधकांना दिली आहे ही बाब अगदी खरी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एका डेमोक्रॅट सदस्याने सांगितले सरकार पुन्हा सुरू व्हावे अशी आमची इच्छा असल्याचे अध्यक्षांना आम्ही सांगीतले पण ट्रम्प यांनी सरकार वर्षानुवर्ष बंद राहिले तरी आपल्याला काही फरक पडत नाही अशी ताठर भूमिका अध्यक्षांनी घेतली. मेक्‍सिकोतून अमेरिकेत होणारी बेकायदेशीर घुसखोरी रोखणे आणि या घुसखोरांकडून होंणारे स्मगलिंग आणि मादकद्रव्यांचा व्यापार रोखणे हाच आपला एकमेव उद्देश आहे त्यासाठी मला सीमेवर सिमेंट क्रॉंकिटची पक्की भिंत घालायची आहे असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)