अनुष्कानंतर आता वरुणचे मीम्स व्हायरल 

अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांचा आगामी “सुई-धागा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून अनुष्का शर्माववरील मीम्स सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. अनुष्काच्या चित्रपटातील लुक्‍सवर खूपच मजेदार मीम्स बनविण्यात आले आहे. यानंतर आता मीम्स क्रिएटर्सने वरुण धवनला लक्ष बनविले आहे. वरुण धवनने आपल्यावरील मीम्सचा व्हिडीओ स्वतःच इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
या चित्रपटातील वरुणचा एक सीन दाखविण्यात आला आहे. या सीनमध्ये वरुण धवन आपल्या मालकांसाठी कुत्रा बनण्याची ऍक्‍टिंग करत आहे. हाच सीन घेऊन मीम्स क्रिएटर्सने बॅकग्राऊंडला ‘Who Let The Dogs Out’ हे गाणे देऊन एक मजेदार व्हिडीओ तयार केला आहे. हा मीम्स व्हिडीओ वरुण धवनलाच एवढा आवडला कि त्याने तो स्वतःच्याच इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करताना वरुण धवनने एक कॅप्शनही दिली आहे. ‘Who let the dogs out. #suidhagamadeinindia’ कोणीतरी मला पाठविले आणि या व्हिडिओला शेअर करण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहीले आहे.
अनुष्का मीम्सवर बोलताना एका मुलाखतीत म्हणाली, मला स्वतःवर बनविण्यात आलेले मीम्स खूपच फनी वाटले. एवढेच नाहीतर मी त्यांना मित्र-मैत्रिणींसोबतही शेअर केले. दरम्यान, “सुई-धागा-मेड इन इंडिया’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वरुण-अनुष्का ही जोडी मौजी-ममताच्या भूमिकेत झळकणार आहेत

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
3 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)