अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धा 
पुणे- अग्रमानांकित अनुरा प्रभुदेसाईने येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला गटातील तिसऱ्या फेरीत विजयी आगेकूच कायम राखली असून दुसरे मानांकन असलेल्या वैष्णवी भालेला पराभवाचा धक्‍का बसला आहे.

तिसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यात गोव्याची खेळाडू आणि स्पर्धेतील अग्रमानांकन असलेल्या अनुरा प्रभुदेसाईने महाराष्ट्राच्या बिगरमानांकित रितिका ठाकरेचा 21-12, 21-15 असा केवळ 35 मिनिटांमध्ये पराभव करताना आपली घोडदौड कायम ठेवली आहे. दुसऱ्या सामन्यात दहावे मानांकन असलेल्या नेहा पंडितने बिगरमानांकित शिवानी सिंगचा 21-12, 21-11 असा केवळ 28 मिनिटांत पराभव करत आपली आगेकूच कायम ठेवली आहे.

याच गटातील आणखी एका सामन्यात दिल्लीच्या बिगरमानांकित भाव्या रिशीने दुसरे मानांकन असलेल्या वैष्णवी भालेचा 21-19, 21-17 असा सहज पराभव करत स्पर्धेत खळबळजनक विजयाची नोंद केली. तर पाचवे मानांकन असलेल्या रिया मुखर्जीने बिगरमानांकित निरंजनाचा 21-13, 21-13 असा पराभव करताना विजयी आगेकूच नोंदवली. तसेच सातवे मानांकन असलेल्या कनिका कन्वालने बिगरमानांकित वैष्णवी के. हिचा 21-18, 21-12 असा पराभव करत चौथ्या फेरीत धडक मारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)