अनुभवी आणि कुशल गोलंदाजांची फळी हेच भारताच्या यशाचे गमक – युझुवेंद्र चहाल

दुबई: आशिया चषकात सलग दोन सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केल्या नंतर भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युझुवेंद्र चहालने अनुभवी आणि कुशल गोलंदाजांची फळी हेच भारतीय संघाच्या यशाचे गमक असल्याचे सांगताना म्हणाला की, संघाकडे कुशल आणि अनुभवी गोलंदाजांची फळी आहे ज्यामुळे एखाद्या खराब कामगिरी नंतर त्याच्या जागी बदली म्हणुन खेळायला आलेला गोलंदाजही तितकाच कुशल असतो त्यामुळे एक प्रकारे चांगली कामगिरी करण्याचा दबाव प्रत्येक गोलंदाजावर असतो त्यामुळे त्याच्या कडुन चांगली कामगिरी होते असेही त्याने यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना चहाल म्हणाला की, इंग्लंडच्या दौऱ्यात जरी भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी या दौऱ्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना आपली छाप सोडली होती. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती भारतीय संघ सध्या आशिया चषकात करत असुन भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांसोबत फिरकी गोलंदाजही आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करत संघाला विजय मिळवून देत आहेत. असेही त्याने यावेळी सांगितले. त्याच बरोबर खराब प्रदर्शना नंतरही संघातील खेळाडू आणि कर्णधारा सोबतच संघ व्यवस्थापन खेळाडूच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहत असल्याने खेळाडूला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळते त्यामुळे संघातील सकारात्मक दृष्टीकोण हा संघाच्या दृष्टीने महत्वाचा आहे.

-Ads-

चहालचा हा पाकिस्तान विरुद्धचा पहिला सामना होता त्याबद्दल विचारले असता चहालने सांगितले की, पाकिस्तान असो वा इंग्लंड मैदानात कोणताही प्रतिस्पर्धी असला तरी तुम्हाला तुमच्या कामगिरी बाबत सकारात्मकता बाळगणे महत्वाचे असते मी ही त्याच दृष्टीने आजच्या सामन्यात गोलंदाजी केली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)