अनुभवाची शिडी २०१८ – सार्थकी लागेल का २०१९ ? (भाग-१)

आज २०१८ या वर्षातील शेवटचा दिवस. आज सरत्या वर्षाला निरोप देऊन उत्साहानं नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्वचजण तयारी करत असतील. परंतु नव्या वर्षात गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून किती जण २०१९ या वर्षाकडं गंभीरतेनं पहात असतील? आता कोणी म्हणेल की पैसा म्हणजे सर्वस्व आहे काय ? तर याचं उत्तर नक्कीच ‘नाही’ असंच आहे परंतु जरी पैसा म्हणजेच सगळं नाही असं असलं तरीहीपैसा म्हणजे बरंच कांही हे प्रत्येकजण मान्य करतच असतो.

२०१८ मध्ये बाजारानं कांही खास समाधानकारक परतावा दिलेला नसला तरी पुढील वर्षांच्या आशेची मुहूर्तमेढ नक्कीच केलेली आहे. आजच्या या लेखात आपण शेवटच्या पायरीवरून २०१८ कडं अवलोकन करूयात व त्याचबरोबर नवीन वर्षात गुंतवणुकीच्या दृष्टीनं फायद्याचे असे कांही निग्रह करूयात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वर्षात बीएसई सेन्सेक्सनं सात टक्क्यांपेक्षा कमी तर निफ्टी५० नं जेमतेम सव्वाचार टक्केच परतावा दिलेला असला तरी बाजारानं या वर्षात ५२ आठवडी नीचांक व सार्वकालीन उच्चांक देखील अनुभवले. जरी मार्केटनं फार उत्तम परतावा दिलेला नसला तरी बजाज फायनान्स, टीसीएस आदी कंपन्यांच्या शेअर्सनी पन्नास टक्क्यांच्या आसपास परतावा देऊन गुंतवणूकदारांचं उखळ निश्चितच पांढरं केलंय. याउलट आयडिया, टाटा मोटर्स, पीएनबी, बीईएल, येसबँक, जेट एअरवेज इत्यादी मातब्बर कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना हवालदिल करून ठेवलंय. आता, ही काय सर्वसामान्य गुंतवणूकदारांचीच व्यथा नाहीयेय तर म्युच्युअल फंड व परदेशी गुंतवणूकदार संस्थांचे देखील असेच हाल आहेत.

सनफार्मासारख्या कंपनीत सप्टेंबरच्या तिमाहीतील म्युच्यअल फंडांची गुंतवणूक होती ८.७५% तर परकीय गुंतवणूकदार संस्थांची होती जवळजवळ १७%, परंतु तो शेअर या वर्षात २६ टक्के पडलाय तर अनुक्रमे ५ व १७ टक्क्यांवर म्युच्युअल फंडांची व परकीय गुंतवणूकदार संस्थांची गुंतवणूक असणाऱ्या अंबुजा सिमेंट्सचा शेअर २१ टक्क्यांपर्यंत खाली आलाय. तशीच अवस्था महानगर गॅस व आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलची. यावरून एक गोष्ट निश्चितपणे स्पष्ट होते ती म्हणजे गुंतवणुकीसाठी योग्य कंपन्यांच्या शेअर्सची उत्तम भावात खरेदी व योग्य भावात विक्री. असो, या वर्षीच्या बाजारातील अनुभवाच्या शिदोरीवरून पुढील वर्ष सार्थकी लागण्यासाठी काही गोष्टी जोपासणं निश्चितच क्रमप्राप्त आहे.

केलेल्या चुका स्वतःशी तरी मान्य करून भविष्यात त्या कटाक्षानं टाळाव्यात – आपण कोठे चुकतोय हे समजून त्यातून शिकण्याची सवय ही बाजारात गुंतवणूक अथवा ट्रेडिंग करणाऱ्यांनी जोपासलीच पाहिजे.

– झालेल्या चुकांची पुनरावृत्ती नको – यासाठीचं उत्तम उदाहरण म्हणजे गुंतवणुकीस अथवा ट्रेडिंगमधे स्टॉपलॉस न लावणं. यावर जास्त न बोललेलंच बरं.

अनुभवाची शिडी २०१८ – सार्थकी लागेल का २०१९ ? (भाग-२)

नकळतपणे झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपली गुंतवणूक अथवा ट्रेडिंग गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. अनेकजण शेअर बाजारात फावला वेळ आहे म्हणून, किंवा वेळ घालवण्यासाठी येतात, व फटका खाल्ल्यानंतर त्याचं खापर ब्रोकरवर अथवा बाजारावर फोडतात. मग बाजाराला जुगार म्हणून मोकळे होतात. खरंतर अशा हौशांनी बाजारापासून दूर राहिलेलंच बरं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)