अनुभवाची शिडी २०१८ – सार्थकी लागेल का २०१९ ? (भाग-२)

अनुभवाची शिडी २०१८ – सार्थकी लागेल का २०१९ ? (भाग-१)

– अपयशावर मात – अपयश हे नेहमी आपल्याला शिकवून जातं. उदाहरणच घ्यायचं झालं तर थॉमसन एडिसनचं घेता येईल, ज्यानं ९९९ अयशस्वी प्रयत्नांनंतर १०००व्या प्रयत्नात विद्युत बल्बचा शोध लावला. तो म्हणतो, ‘मी ९९९ वेळेस अपयशी ठरलो नाही तर ९९९ प्रकारे बल्ब कसा बनू शकत नाही हे मी शिकलो’. म्हणून अपयश पचवून खंबीर राहण्यास महत्त्व आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

– आपल्या योग्य निर्णयांना चिकटून रहा, निर्णय बदलू नका – जर तुम्ही जाणकारांद्वारे घेतलेले निर्णय योग्यच असतील तर त्यात वारंवार बदल करू नका. स्वतःवर व स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा, फक्त हाच विश्वास फाजील असू नये म्हणून खबरदारी घ्या.

– स्वतःचे निर्णय स्वतः अभ्यासपूर्वक घ्यावेत – कोणताही निर्णय घेताना तो अभ्यासपूर्वक, योग्यप्रकारे व काळजीपूर्वकच घ्या.

– योग्यप्रकारे केलेल्या गुंतवणुकीबद्दल खात्री बाळगा – जर तुमची गुंतवणूक पद्धत योग्य असेल तर योग्यप्रकारे केलेल्या गुंतवणुकीबद्दल खात्री बाळगणं गरजेचं आहे. बाजारात प्रत्येक गोष्टीची एक सायकल असते. समजा, जर तुमची गुंतवणूक तेल कंपन्या, रंग उत्पादक कंपन्या अथवा हवाई वाहतूक कंपन्यांमध्ये असेल व कच्च्या तेलाच्या किमती वाढत असतील तर अशा कंपन्यांच्या शेअर्सचे भाव खाली येणारच परंतु कच्च्या तेलाच्या बाबतीत योग्य अभ्यास करून जर संबंधीत कंपन्यांत गुंतवणूक केली तर निश्चितच ती फायद्याची ठरेल. तसंच, आयटी कंपन्यांमधील गुंतवणुकीवर रुपयाच्या विनिमयाचा परिणाम होत असतो त्यामुळं जेव्हा रुपयाचा दर डॉलरच्या तुलनेत उच्चांक पातळीवरअसतो तेव्हा अशा कंपन्यांमधील गुंतवणूक काढून घेणंच हितावह ठरू शकतं. त्याचप्रमाणं, कोणा ऐऱ्या गैऱ्याचं ऐकून गुंतवणूक करू नका; तसंच केलेली गुंतवणूक काढून देखील घेऊ नका. आधी संबंधित गोष्टींबद्दल खात्री करा व तज्ञांबरोबर चर्चा करूनच विचारपूर्वक निर्णय घ्या.

– रास्त अपेक्षा – बाजारापासून रास्त, वास्तववादी अपेक्षा ठेवा. नक्कीच, बाजार एका रात्रीत कोट्याधीश करू शकतो, म्हणून बाजारापासून अव्वाच्या सव्वा अपेक्षा ठेऊ नका. केलेल्या गुंतवणुकीपासून कोणतेही शारीरिक कष्ट न घेता आपण अपेक्षा ठेवतोय हे ध्यानात असू द्या. त्यामुळं साधारपणे बँकेच्या व्याजदराच्या दुप्पट परताव्याची अपेक्षा करा. छोटा-छोटा नफा पदरात पाडताना कमावलेला नफा व त्याजबरोबरीनं येणारा आत्मविश्वास पुढील गुंतवणुकीसाठी महत्वाचा ठरू शकतो. वेळ पडल्यास नुकसान सोसून आपली गुंतवणूक बाहेर काढून घेण्याचीही तयारी ठेवा.

– संयम – सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे केलेल्या गुंतवणुकीबद्दल संयम बाळगा. ज्याप्रमाणं कितीही उत्तम प्रतीचं झाड लावलं तरीही ते योग्यत्या वेळेसच फळ देणार व तोपर्यंत त्यास खत-पाणी हेद्यावंच लागणार. त्याप्रमाणेच विचार, गुंतवणुकीबाबतही करावा.

– समाधान – सगळ्यात शेवटी म्हणजे, आपल्या परताव्याबाबत समाधानी असणं फार गरजेचं आहे. जगातील प्रत्येक सर्वोत्तम गोष्ट आपल्यालाच मिळत नसते त्याप्रमाणं जे मिळालंय त्यात आनंद मानल्यास लाभातून लोभात जायची वेळ येणार नाही.

बायबल मनुष्यांवर प्रीति करावयास शिकवतं तर पैसा पैशावर प्रेम करायला शिकवतो. पैसे कमावण्याची खुबी कळली तर त्यात रस वाटेल व त्यात रस वाटल्यास त्यावर प्रेम जडेल,  बघा पटतंय का !


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)