अनुप जलोटा -जसलीन यांची जोडी झाली वेगळी

अनुप जलोटा आणि जसलीन ही जोडी आता वेगळी झाली आहे.  बिग बॉसमध्ये एका टास्क मध्ये जसलीनला आपले कपडे, मेकअपचे साहित्य आणि आपले दुसऱ्याला (दीपिका कक्कडला) द्यायचे होते आणि आपले केस कापायचे होते. तिने तो टास्क पूर्ण केला नाही आणि त्यामुळे नाराज झालेल्या अनुप जलोटा यांनी तिच्यासमवेत ब्रेकअप केला. 
 
सर्वजण जेवण्यास जमा झाल्यावर ते त्यांनी सर्वाना उद्देशून इकडे लक्ष द्या, मी सर्वाना सांगू इछितोकाल जसलीनने ज्याप्रकारे टास्क केले नाही ते मला आवडले नाही. तिने कपडे तिथे आणायला हवे होते. तुम्ही समोरच्या व्यक्तीवर किती प्रेम करता ते यातून दिसून येते. तिने कपडे, मेकअप आणि केसांप्रती जास्तप्रेम दाखवले त्यामुळे मी हि जोडी तोडतो आहे आणि मी सध्या एकटा आहे. 

हा विडिओ खूप वायरल होत असून त्यातील अन्य काही व्हिडिओ देशील वायरल होत आहेत ज्यामध्ये जसलीन खूप रडत आहे तर अनुप आपल्या निर्णयावर ठाम आहेत. 

-Ads-

या नवीन पर्वातील सर्वांत वेगळी जोडी ठरली होती भजन सम्राट अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांची. या दोघांनी गुरु-शिष्या म्हणून यामध्ये सहभाग नोंदवला आहे परंतु हे मागील साडे तीनवर्षांपासून रिलेशनमध्ये आहेत. अनुप जलोटा यांचे वय ६५ आहे तर जसलीनचे वय २८ वर्षे आहे. दोघांच्या वयामध्ये तब्बल ३७ वर्षांचे अंतर आहे. वयामध्ये इतके अंतर असून देखील दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. 

 

‘बिग बॉस सीजन १२’  मध्ये वकेन्ड का वार  भागात प्रथमच दोन कंटेस्टेंट्स  घरच्या बाहेर गेले होते.  रोशमी बनिक आणि कृति वर्मा बिग बॉस १२ मधून एलिमिनेट होणारी पहिली जोडी होती. घरच्या बाहेर झाल्यानंतर त्यांनी घरातील काही खुलासे केले. त्यांनी  सर्वात मोठा खुलासा भजन सम्राट अनुप जलोटा आणि त्यांची ३७ वर्षे लहान मैत्रीण जसलीन मथारू यांच्यातील संबधाबाबतचा होता.
 
६५ वर्षीय अनुप जलोटा आणि त्याची २८ वर्षीय मैत्रीण जसलीन मथारू यांच्या नात्याबद्दल या  भागापासूनच चर्चा होत आहे. लोकांसाठी दोघांच्या नात्याला मान्यता देणे जाड जात आहे. त्यामुळे काही लोक याला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहते. परंतु, रोशमी आणि कृति यांनी या नात्यातील सत्य समोर आणले आहे. ते म्हणतात की, जसलीन आणि अनुप जलोटा यांच्या नात्यात सत्यता  आहे. सुरुवातीला या दोघींना देखील ते खोटे वाटत होते परंतु त्यांच्या सोबत राहिल्यावर त्यातील सत्यता समोर येते.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)