अनुप जलोटा आणि जसलीन हे पुन्हा प्रेमात

सलमान खानाचा विवादित शो “बिग बॉस’मध्ये यंदाच्या वर्षी सर्वात विवादित ठरलेली जोडी म्हणजे जसलीन माथारू आणि अनुप जलोटा यांची. या दोंघांच्या वयामध्ये तब्बल 37 वर्षांचे अंतर आहे. या जोडीने आपल्या प्रेमाची कबुली सर्वांना या अगोदारच दिली होती. परंतु, बिग बॉसमधील एका एलिमिनेशन टास्कमध्ये जसलीनने अनुप यांच्यासाठी आपल्या काही वस्तू अन्य स्पर्धकाला दिल्या नव्हत्या. त्यामुळे या जोडीमध्ये थोडा तणाव चालू होता.

अनुप जलोटा यांनी सर्वांसमोर हे घोषित केले होते की, ते आता बिग बॉसमध्ये एकटे आहेत. ते त्यांची आणि जसलीनची जोडी तोडत आहेत. यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चाना उधाण आले होते. परंतु, पुन्हा ही जोडी एकत्र झाली आहे. यामध्ये बिग बॉसचा देखील खूप मोठा वाट आहे.

-Ads-

या जोडीसाठी बिग बॉसने रोमॅंटिक डिनरचे आयोजन केले होते. त्यावेळी या जोडीने रोमॅंटिक डान्स केले. त्यानंतर अनुप जलोटांनी जसलीनला गुलाबाचे फुल देऊन “आय लव्ह यु’ म्हणत पुन्हा प्रेमात असल्याची कबुली दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)