अनुपम खेर यांनी शेअर केला मनमोहन सिंग यांच्या लुकमधील फोटो

“द अक्‍सिडेंटल प्राईम मिनीस्टर’ या आगामी चित्रपटात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भूमिका साकारणारे अर्जुन माथूर आणि आहना कुमारा यांचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. “द अक्‍सिडेंटल प्राईम मिनीस्टर’मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनुमप खेर साकारणार आहेत. खेर यांनी ट्‌विटरवरून खास चाहत्यांसाठी हा फोटो शेयर केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. सिंग यांचा माध्यम सल्लागार संजय बारू यांनी 2014 मध्ये लिहिलेल्या याच्या नावाच्या संस्मरणावर आधारित हा चित्रपट आहे. डॉ. सिंह संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात 2004 ते 2014 पर्यंत पंतप्रधान होते. या चित्रपटातून अर्थतज्ज्ञ ते राजकारणी या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला आहे. अक्षय खन्ना हा यामध्ये संजय बारूंच्या भूमिकेद्वारे बऱ्याच दिवसानंतर चित्रपटात दिसणार आहे. तसेच सुझान बर्नेट यांचाही यात समावेश आहे.

विजय गुट्टा यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि हंसल मेहता यांनी लिहिलेला हा चित्रपट 21 डिसेंबर 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)