अनुपम खेर यांचा एफटीआय अध्यक्षपदाचा राजीनामा

पुणे – ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या आगामी आंतरराष्ट्रीय प्रकल्पांच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने एफटीआयआयचं अध्यक्षपदाचे कामकाज हाताळण्यासाठी वेळेचे नियोजन करणे कठीण होत असल्याचे कारण देत खेर यांनी राजीनामा दिले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राजीनामा दिला असल्याचे सांगत, या दरम्यान विद्यार्थी आणि सहकारी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल खेर यांनी आभार व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या दीड एफटीआयआयच्या वर्षापासून रखडलेली एफटीआयआय सोसायटीची बैठक मंगळवारी मुंबईत पार पडली. या बैठकीसाठी खेर हेदेखील उपस्थित होते. बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी खेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या बैठकीला अनुपम खेर यांच्यासह नियामक मंडळाचे नवनियुक्त उपाध्यक्ष बी. पी. सिंग, अभिनेत्री दिव्या दत्ता, प्रा. अर्चना राकेश सिंग, संचालक भूपेंद्र कॅन्थोला आदींची उपस्थिती होती.

गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर संस्थेत बराच वाद निर्माण झाला होता. या काळात विद्यार्थ्यांनी आंदोलनदेखील केले होते. चौहान यांची अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे खेर यांची एफटीआयाअयच्या अध्यक्षपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ही मुदत संपण्यापूर्वीच खेर यांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या अधिकृत्य ट्विटर हॅन्डलवरून राजीनामा दिल्याचे सांगतच, “संस्थेतील माझा कार्यकाळ हा अतिशय अनुभव संपन्न करणारा कार्यकाळ होता. या दरम्यान अनेक गोष्टी शिकता आल्या. एका प्रतिष्ठित संस्थेशी जुळण्याचे सौभाग्य मला मिळाले. या दरम्यान विद्यार्थी आणि शिक्षक यांनी केलेले सहकार्यासाठी त्यांचे आभार मानतो तसेच आगामी काळासाठी आम्ही एक योग्य अशी प्रशासकीय समिती नियुक्त केली असून, विद्यार्थ्यांना त्यातून मोलाचे मार्गदर्शन मिळेल,” असा विश्‍वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)