अनुपम खेर आणि अन्य १३ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

मुजफ्फरपुर : ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित ‘दी अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा सिनेमा ११ जानेवारीला रिलीज होणार आहे. दरम्यान, हा चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसून येत आहे.

बिहारमधील एका न्यायालयाने या संबंधित अनुपम खेर आणि अन्य जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खेर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अ‍ॅड सुनील ओझा यांनी या चित्रपटाविरोधात मुजफ्फरपुर येथील स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी करताना खेर आणि अन्य १३ जणांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चित्रपटाविरोधात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, या चित्रपटामधून काही प्रसिद्ध व्यक्तीच्या प्रतिमा मलिन करण्याच्या प्रयत्न केला आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)